Nagpur Violence Info 2025 in Marathi: कोण आहे हा फहीम खान? नागपूरमध्ये अचानक उफाळलेल्या हिंसाचाराचा मास्टरमाईंड

Nagpur Violence Info 2025 in Marathi: जाणून घेऊया सविस्तर माहित फहीम खान बद्दल.

Nagpur Violence Info 2025 in Marathi: राज्यात सध्या चर्चा आहे ती १७ मार्च सोमवारी रात्री नागपुरात अचानक उफाळलेल्या हिंसाचाराच्या बातम्या बद्दल. शहरात नावाची स्थिती निर्माण करणाऱ्या या हिंसाचारामागील मास्टरमाईंड म्हणून ज्या व्यक्तीचा उल्लेख होतोय तो 38 वर्षाचा फहीम खान.

 या हिंसाचाराच्या अनेक बातम्या आता समोर येत असून, त्यामध्ये , मग महिला पोलिसाला चुकीचा स्पर्श करुन वर्दी खेचून केलेला विनयभंग, कॅमेऱ्याची तोडफोड अशा विविध घटना समोर येत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, फहीम खानने या हिंसाचाराची योजना आखली होती, ज्यामुळे नागपूरच्या शांततेला धक्का लागला.

 कोण आहे हा फहीम खान?

या संदर्भात एका वृत्तपत्राने माहिती दिल्यानुसार, फहीम खान हा माइनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा नागपूर शहर अध्यक्ष आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात त्याने निवडणूक लढवली होती, परंतु त्याला दणदणीत पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर, फहीमने आपल्या समर्थकांची फौज तयार करण्यास सुरुवात केली आणि राजकारणात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला.

“आता मोबाईल वरून पीएम इंटर्नशिप योजनेचा करा अर्ज” 

कट रचला जातोय?

पोलिसांच्या माहितीनुसार,फहीम खानने काही कट्टरपंथी लोकांना एकत्र करून नागपूर हिंसाचार घडवण्याचा कट रचला होता. हिंसाचाराच्या एक दिवस आधी, गणेशपेठ ठाण्याबाहेर “औरंगजेब जिंदाबाद” नारे लावण्यात आले, ज्यामध्ये फहीम खानही उपस्थित होता. त्याने जमावाला चिथावणी देण्याचे काम केले, ज्यामुळे तणाव वाढला.

Nagpur Violence Info 2025 in Marathi: कोण आहे हा फहीम खान? नागपूरमध्ये अचानक उफाळलेल्या हिंसाचाराचा मास्टरमाईंड

हिंसाचाराची तीव्रता

पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी रात्री चिटणीस पार्क परिसरात तणाव वाढताच, काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत ३४ पोलीस कर्मचारी जखमी झाले. सोशल मीडियावर अफवा पसरल्यानंतर, एका समुदायाने धार्मिक पुस्तक जाळले, ज्यामुळे वातावरण आणखी चिघळले.

अटक आणि कारवाई

नागपूर हिंसाचारानंतर फहीम खानला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यातंर्गत कारवाई करण्याचा विचार केला जात आहे. पोलिसांनी फहीम खानच्या कॉल डिटेल्स आणि सोशल मीडियावरील हालचालींचा तपास सुरू केला आहे.

कर्फ्यू आणि सुरक्षा उपाय

पोलिसांच्या माहितीनुसार, बिघडलेली कायदा सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी, नागपूरच्या संवेदनशील भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे. नागपूर पोलिसांनी ५० हून अधिक जणांना अटक केली आहे, ज्यामध्ये फहीम खानचा समावेश आहे. सध्या नागपूरात परिस्थिती नियंत्रणात आहे, परंतु खबरदारी म्हणून अद्याप काही भागात कर्फ्यू लागू आहे.

हे पहा>>>>>भारत सरकारचे हे सात कार्ड आहेत का तुमच्याकडे?

अनुदान मिळवा! औषधी वनस्पतींच्या विकासासाठी केंद्र सरकारची ही योजना

Loading