Ration Card KYC 2025 in Marathi: जाणून घेऊया संपूर्ण माहिती
Ration Card KYC 2025 in Marathi: तुमचं रेशन कार्ड अजून आधारशी जोडलं नाहीये? ई-केवायसीची प्रक्रिया राहिली आहे? तर मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने शिधापत्रिकेला (Ration Card KYC) आधार क्रमांक जोडून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिलेली मुदत ३० एप्रिल २०२५ पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत ३१ मार्च २०२५ होती.
ई-केवायसी न करणाऱ्यांची शिधापत्रिकेवरील नावे वगळली जाणार आहेत, ज्यामुळे त्यांना धान्य मिळणार नाही, असा इशारा सरकारने दिला आहे.
रेशन कार्ड… आपल्यापैकी अनेकांसाठी हे केवळ एक कागदपत्र नाही, तर आपल्या हक्काचं धान्य मिळवण्याचं साधन आहे. आता या महत्त्वाच्या कागदपत्राला आधारशी जोडण्याची आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे.
सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी पडताळणी करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारने दिल्या आहेत. यामुळे राज्यातील सर्व रास्त भाव दुकानांवर ई-केवायसी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना प्रलंबित ई-केवायसी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Ration Card KYC 2025 in Marathi: ई-केवायसी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राष्ट्रीय सूचना केंद्राने “मेरा केवायसी” नावाचे मोबाईल ॲप विकसित केले आहे, ज्याद्वारे लाभार्थी घरबसल्या ई-केवायसी पूर्ण करू शकतात. ३० एप्रिलपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास शिधापत्रिका बंद होण्याची शक्यता आहे.
रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ
आता कुणाचं रेशन कार्ड होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?