UPI ATM cash withdrawal without card:आत्ताच जवळच्या एटीएमला भेट द्या आणि ही नवीन सुविधा वापरून पहा
UPI ATM cash withdrawal without card: ATM कार्ड घरी विसरलात? काळजी करू नका! आता UPI (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) वापरून कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढता येतात. ही सुविधा भारतातील अनेक बँका जसे की, (SBI, HDFC, ICICI) देऊ लागल्या आहेत, ज्यामुळे आपत्कालीन वेळी रोख पैसे काढणे सोपे झाले आहे. फक्त तुमच्या स्मार्टफोनमधील Google Pay, PhonePe किंवा PayTM आणि एटीएमवरील QR कोड स्कॅन करून काही मिनिटांत रक्कम काढता येते. चला, या लेखातून ही पद्धत स्टेप-बाय-स्टेप समजून घेऊया

UPI-ATM सुविधा कोणत्या बँकांमध्ये उपलब्ध?
Which banks offer UPI ATM facility?
- सध्याही सुविधा ICICI, HDFC, Axis, SBI, IDFC First सारख्या बँकांच्या ATM मशीनवर उपलब्ध आहे.
- ATM स्क्रीनवर “Cardless Cash Withdrawal” किंवा “UPI Cash Withdrawal” हा पर्याय शोधा.

पैसे काढण्याची प्रक्रिया
Withdrawal process
- स्टेप 1: एटीएममध्ये जा आणि “UPI Cash Withdrawal” पर्याय निवडा.
- स्टेप 2: स्क्रीनवर दिसणाऱ्या QR कोडला तुमच्या UPI ॲपने स्कॅन करा.
- स्टेप 3: काढू इच्छित रक्कम एंटर करा आणि UPI PIN टाकून पुष्टी करा.
- स्टेप 4: एटीएममधून रोख पैसे मिळतील.
”आयुष्मान कार्डवर ५ लाख रुपये मोफत उपचार! तुम्ही पात्र का?
फक्त या गोष्टी लक्षात ठेवा
Just remember these things
तुमच्या फोनमध्ये Google Pay, PhonePe, Paytm किंवा तुमच्या बँकेचे UPI ॲप इन्स्टॉल असले पाहिजेत.
दैनिक मर्यादा( daily limit)
प्रति व्यवहार ₹5,000 ते ₹10,000 आणि दररोज ₹20,000 पर्यंतच मर्यादा असू शकते.
QR कोड एका वेळी वापरला जातो, त्यामुळे फसगत होण्याची शक्यता कमी.
UPI ATM cash withdrawal without card: UPI-ATM सुविधा डिजिटल इंडियाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. एटीएम कार्ड नसतानाही आता तुम्ही सहजपणे रोख पैसे काढू शकता. ही सुविधा अधिक बँकांमध्ये लवकरच उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत, तुमच्या बँकेच्या ATM चेक करून ही सुविधा वापरून पहा. ज्या एटीएमवर “UPI Cash Withdrawal” पर्याय दिसतो, तेथेच ही सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी तुमच्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर हा लेख इतरांसोबत शेअर करा.
UPI ATM cash withdrawal without card: