Aajche Rashi Bhavishya 23 Feb 2025: तुमच्या राशीसाठी जाणून घ्या काय उपाय आणि सूचना!
Aajche Rashi Bhavishya 23 Feb 2025: आज तुमच्या नशिबात काय दडलंय, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल, तर हा लेख नक्की वाचा. काही छोटे उपाय केल्याने नक्कीच चांगला मार्ग मिळेल.तुमच्या राशीनुसार वाचा आजचं भविष्य आणि मिळवा भविष्यातील खास संकेत.” भविष्यातील अडचणींवर मात करण्याचा मार्ग मिळतो आणि नवाजीवन जगण्याचा मार्ग मिळतो.
चला तर मग पाहूया मेष, वृषभ ,मिथुन अशा सर्व राशींची व्यक्तीने हे उपाय केले तर नक्कीच त्यांना लाभ पाहायला मिळतील.
मेष राशी(23 फेब्रुवारी, 2025)
Aries
चंद्र राशी प्रमाणे आजचे राशी भविष्य :
Aajche Rashi Bhavishya 23 Feb 2025:क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील.
तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमँटिक दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी कराल. व्यवसायात नफा या राशीतील व्यावसायिकांसाठी आज उत्तम स्वप्न खरे होण्यासारखे असेल.
उपाय-
अग्नीला दुधाच्या पाच आहोत त्या देणे याने आर्थिक अडचणीत दूर होतील.
वृषभ राशि(23 फेब्रुवारी, 2025)
Taurus
जन्म राशी प्रमाणे उद्याची राशी भविष्य :
तुम्ही आहार व्यवस्थित घ्या विशेषत: अर्धशीशीच्या रुग्णांनी अन्नसेवन योग्य वेळी न केल्यास त्यांना विनाकारण भावनिक ताणाचा सामना करावा लागेल. ज्या लोकांची अजून सॅलरी आलेली नाही आज ते पैश्याला घेऊन खूप चिंतीत राहू शकतात आणि आपल्या मित्राकडून उधार मागू शकतात.
Aajche Rashi Bhavishya 23 Feb 2025:तुमच्या प्रियकर/प्रेयसीने केलेल्या शेरेबाजीवर तुम्ही खूप संवेदनशील बनाल – तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थिती अधिक बिघडतील असे कृत्य करणे टाळा.
उपाय
वय वर्ष बारा वर्षे पर्यंतच्या कुमारीकेला पाय धुणे कुंकवाचे मळवट भरवणे गजरा देणे वपूजन करून पायस खाऊ घालवणे.
मिथुन राशि (23 फेब्रुवारी, 2025)
Gemini
चंद्र राशी प्रमाणे आजचे राशी भविष्य :
हा दिवस खूप उत्तम असेल. मित्र आणि जवळच्या लोकांसोबत बाहेर जाऊन सिनेमा पाहण्याची योजना ही बनवू शकतात.
अधिक कोलेस्टेरॉल असलेला आहार सेवन करणे टाळा. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. तुम्हाला जीवनसाथी मिळाल्यामुळे दीर्घकाळ असणारी उदासवाणी एकाकी अवस्था संपून जाऊन वातावरण उत्साही बनेल.
उपाय
हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करणे.
कर्क राशि (23 फेब्रुवारी, 2025)
Cancer
चंद्र राशी प्रमाणे आजचे राशी भविष्य :
बसताना कोणतीही दुखापत होणे टाळण्यासाठी काळजी घ्या. खुर्चीत किंवा कोचावर कुठेही व्यवस्थित, नीटपणे बसले तर व्यक्तिमत्व खुलून दिसते. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे योग्य पद्धतीने बसल्यामुळे आरोग्य आणि आत्मविश्वास वाढतो. दुस-यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केलीत तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. पाहुण्यांना भेटण्यात संध्याकाळ व्यतीत होईल.
उपाय
नारळाच्या खोबऱ्यामध्ये खडीसाखर पीठ व एक चमचा तूप टाकून पिंपळाच्या झाडाखाली ठेवणे.
सिंह राशि (23 फेब्रुवारी, 2025)
Leo
चंद्र राशी प्रमाणे आजचे राशी भविष्य :
आजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. शरीराला तेलाने मसाज करुन तुमचे स्नायू मोकळे करा. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. तुम्ही कार्यालयात अतिरिक्त वेळ खर्च केलात तर तुमच्या घरगुती जीवनावर परिणाम होईल.
उपाय
कौटुंबिक जीवनामध्ये आनंदी राहण्यासाठी आपल्या वजना एवढे गोशाळेमध्ये धान्य (गहु )दान करावे.
कन्या राशि (23 फेब्रुवारी, 2025)
Virgo
चंद्र राशी प्रमाणे आजचे राशी भविष्य :
गरज नसलेल्या अशक्य गोष्टींवर विचार करण्यात तुमची शक्ती खर्च करू नका, त्यापेक्षा इतर योग्य कामासाठी तिचा वापर करा. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधुन जात आहे त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील.
कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. तुमच्या उपस्थितीमुळे तुमच्या प्रिय व्यक्तीचे विश्व स्वर्ग बनेल. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात.
उपाय
माशांना कणकेचे गोळे करून खाऊ घालावे वाहत्या पाण्यामध्ये किंवा स्थिर पाण्यात असेल तरी चालेल.
तुळ राशी (23 फेब्रुवारी, 2025)
Libra
चंद्र राशी प्रमाणे आजचे राशी भविष्य :
अतिखाणे टाळा, तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा. आकर्षक वाटणा-या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या.
कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो आणि त्यामुळे तुमच्या हातून काही मोठ्या चुका घडू शकतात, याची जाणीव ठेवा. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे.
उपाय
आपल्या मधील असलेली उत्सुकता यावर नियंत्रण ठेवा. व हिरवी वस्तू सोबत ठेवणे किंवा वस्त्र परिधान करावे.
वृश्चिक राशि(23 फेब्रुवारी, 2025)
Scorpio
चंद्र राशी प्रमाणे आजचे राशी भविष्य :
मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. नातेवाईक तुमच्यासाठी अनपेक्षित भेटवस्तू आणतील पण तुमच्याकडूनही काही मदतीची अपेक्षा ठेवतील.
आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. आपल्या वाटेत येणा-या सर्वांशी अत्यंत नम्र, सौम्य आणि आकर्षकपणे वागा.
उपाय
पांढरे वस्त्र दान करणे.
धनु राशि (23 फेब्रुवारी, 2025)
Sagittarius
चंद्र राशी प्रमाणे आजचे राशी भविष्य :
वैरभाव महागात पडू शकतो. त्यामुळे आपल्या सहिष्णूतेला, उदार स्वभावाला सुरुंग लागू शकतोच, पण आपल्या विचार करण्याच्या शक्तीला धक्का लागू शकतो. परिणामी आपल्या नातेसंबंधात कायमस्वरुपी फूट पडू शकते. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे.
एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिके/का ला दुखवू नका, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल.
उपाय
महादेवाच्या मंदिरात तुपाचा दिवा लावणे व बेल वाहने शंकराची पूजा करणे.
मकर राशि (23 फेब्रुवारी, 2025)
Capricorn
चंद्र राशी प्रमाणे आजचे राशी भविष्य :
आपल्या आकांक्षा आणि महत्वाकांक्षाना धक्का लागण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत मोठ्या प्रमाणात दिसून येते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य सल्ल्याची आपणास गरज आहे. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. तुमच्या रोमॅण्टिक जोडीदाराशी फोनवर बराच काळ न बोलून तुम्ही जोडीदाराला छळाल.
उपाय
घरातून बाहेर पडताना दूध व दही याचे सेवन करणे त्याने आपले आरोग्य चांगले राहील.
कुंभ राशी (23 फेब्रुवारी, 2025)
Aquarius
चंद्र राशी प्रमाणे आजचे राशी भविष्य :
तुमच्या मनातील नकारात्मक विचार झटकून टाका नाहीतर तो मानसिक आजार बनेल. दानशूर कार्यात स्वत:ला झोकून द्या व त्यायोगे नकारात्मक विचारावर मात करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल.
झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील आणि तुमचा मित्रपरिवार विस्तारेल. प्रणयराधना तुमच्या हृदयावर राज्य करील.
उपाय
असत्य बोलणे टाळा किंवा असत्यांची बाजू घेणे टाळला किंवा खोटी साक्ष देणे टाळा असे केल्याने आपल्या कुटुंबातील आपले वर्चस्व चांगले राहील.
मीन राशी (23 फेब्रुवारी, 2025)
Pisces
चंद्र राशी प्रमाणे आजचे राशी भविष्य :
छोट्या मोठ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. कमिशन-लाभांश- किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. प्रेम म्हणजे देवाजी पुजा करण्यासाखेच आहे; ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला आज हे कळेल. काम लवकर पूर्ण करून लवकर घरी जाणे आज तुमच्यासाठी उत्तम राहील यामुळे तुमच्या कुटुंबातील लोकांना ही आनंद मिळेल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल.
उपाय
उद्या कुत्र्यांना दूध पाजवणे किंवा पोळी खाऊ घालने असे केल्याने आरोग्य सुदृढ राहील .
Aajche Rashi Bhavishya 23 Feb 2025:
मोका..मोका..पुन्हा भारत पाकिस्तान लढत?
आजच्या अनुकूल दिवसाचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा!
श्री गजानन लीला गाथा १४ अध्याय (लहान पोथी)
आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?
श्री गजानन लीला गाथा १३ अध्याय (लहान पोथी)
Shivleelaamrit 9 Adhyay: ‘शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा पाचवा अध्याय !
वृंदावन वाले प्रेमानंद जी महाराज..
शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?
थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!
“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!
हक्काची पेन्शन! PM श्रमयोगी मानधन योजना तुमच्या कुटुंबासाठी!