Ayushman Card benefits in Marathi: जाणून घ्या कोणत्या रोगांवर मिळते मोफत उपचार आणि फायदे
Ayushman card benefits in Marathi: नमस्कार, सध्या द्यकीय खर्च वाढल्यामुळे गरीब-मध्यमवर्गीयांना उपचार घेणे कठीण झाले आहे. या समस्येच्या निराकरणासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार पुरवले जातात. दुर्दैवाने, अजूनही अनेक नागरिकांना या योजनेबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे ते या लाभापासून वंचित राहत आहेत.
चला तर मग,आज या लेखातून आपण आयुष्मान भारत योजनेची संपूर्ण माहिती, पात्रता निकष, अर्ज करण्याची पद्धत आणि कोणत्या रोगांवर मोफत उपचार मिळतात ते समजून घेऊया.
आयुष्मान कार्ड (PM-JAY) म्हणजे काय?
What is Aayushman Card?
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY), ज्याला आयुष्मान भारत योजना असेही म्हणतात, ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील १० कोटी गरीब आणि गरजू कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार पुरवले जातात.
योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये
features
Ayushman Card benefits in Marathi: ५ लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय खर्च कव्हर
देशभरातील २५,००० हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार
१,५०० पेक्षा जास्त रोगांचा समावेश
पूर्व आणि नंतरच्या खर्चाचा समावेश (डायग्नोस्टिक, औषधे, हॉस्पिटल बिल)
पारिवारिक कव्हरेज (एका कार्डवर संपूर्ण कुटुंबासाठी सुविधा)

कोण पात्र आहे?
Who is eligible?
Ayushman Card benefits in Marathi: या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे:
ग्रामीण भागातील गरीब कुटुंबे (D1, D2 श्रेणी)
शहरी भागातील कामगार व गरिबी रेषेखालील कुटुंबे
SC/ST, अनाथ, वृद्ध आणि दिव्यांग व्यक्ती
राज्य सरकारने निर्धारित केलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लोक
“महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! परदेशी शेती तंत्रज्ञान शिकण्यासाठी मोफत दौरा!”
कोण असतील अपात्र
Ayushman Card benefits in Marathi: करदाते
पीएफ (PF ) किंवा ESIC सुविधा घेणारे कर्मचारी
श्रीमंत कुटुंबे (निश्चित उत्पन्नापेक्षा जास्त असलेले)
कसे तपासाल की तुम्ही पात्र आहात?
ऑफिशियल वेबसाइटवरजावं लागेल https://beneficiary.nha.gov.in
तेथे “Am I Eligible?” वर क्लिक करा.
मोबाईल नंबर टाकून OTP प्राप्त करा.
आपले नाव, राज्य, जिल्हा इ. तपशील भरा.
जर नाव यादीत असेल, तर तुम्ही पात्र आहात.

कोणत्या रोगांवर मिळते मोफत उपचार?
Which diseases get free treatment?
PM-JAY अंतर्गत १,५००+ प्रकारच्या रोगांवर उपचार पुरवले जातात, त्यापैकी काही मुख्य आहेत:
१. हृदयरोग
- हार्ट ॲटॅक, बायपास सर्जरी, अँजिओप्लास्टी
२. कर्करोग
- स्तन कर्करोग, पोटाचा कर्करोग, केमोथेरपी
३. न्यूरोलॉजिकल विकार
- ब्रेन स्ट्रोक, पार्किन्सन, मेंदूचे ट्यूमर
४. मूत्रपिंड व यकृताचे आजार
- डायलिसिस, यकृत प्रत्यारोपण
५. श्वसन विकार
- अस्थमा, टीबी, न्यूमोनिया
६. ऑर्थोपेडिक्स
- हाडांच्या शस्त्रक्रिया, कंबर आणि गुडघा बदल
७. प्रसूती सेवा
- सिझेरियन डिलिव्हरी, हिस्टेरेक्टॉमी
योजनेचे फायदे
- मोफत हॉस्पिटलायझेशन
- दवाखान्यातील खर्चाची परतफेड
- गंभीर आजारांवर संपूर्ण कव्हरेज
- संपूर्ण कुटुंबासाठी सुरक्षा
अधिक माहितीसाठी भेट द्या: https://pmjay.gov.in
हेल्पलाइन: 14555 / 1800-111-565
Ayushman Card benefits in Marathi: शून्य खर्चात करा पत्नीच्या नावे शेतजमीन – लक्ष्मी मुक्ती योजनेचा लाभ घ्या!