Ayushman Card Checklist 2025 in Marathi: तुमचं नाव आहे का आयुष्मान कार्डच्या यादीत?

Ayushman Card Checklist 2025 in Marathi: आता घरबसल्या करा तपासणी!

Ayushman Card Checklist 2025 in Marathi: आयुष्मान योजनेत नोंदणी केली आहे? पण आता प्रश्न आहे, तुमचं नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही. हे कसं तपासणार? आजच्या महागाईच्या काळात, आरोग्य सेवांचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. अशा परिस्थितीत, प्रत्येकाकडे आरोग्य विमा असणे अत्यावश्यक आहे. याच गरज ओळखून, यासंदर्भात पडणाऱ्या अनेक प्रश्न बाबत आज आपण या लेखांमध्ये उत्तरे पाहणार आहोत जसे की तुम्ही आरोग्य सुरक्षा कवचचा भाग आहात की नाही, आयुष्मान भारत कोणासाठी आहे.
चला तर मग पाहूया या संदर्भात माहिती पुढील प्रमाणे.

कोणासाठी आहे ५ लाखांपर्यंतचा आधार?

Who is eligible for support up to 5 lakhs?


Ayushman Card Checklist 2025 in Marathi: आजच्या महागाईच्या काळात, आरोग्य सेवांचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. अशा परिस्थितीत, प्रत्येकाकडे आरोग्य विमा असणे अत्यावश्यक आहे. याच गरज ओळखून, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि वंचित बांधवांना दर्जेदार आरोग्य सेवा मोफत मिळाव्यात, यासाठी २०१८ मध्ये मोदी सरकारने आयुष्मान भारत योजनेची सुरुवात केली. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) म्हणूनही ओळखली जाणारी ही योजना, जगातील सर्वात मोठ्या सरकारी आरोग्य विमा योजनांपैकी एक आहे. या योजनेत समाविष्ट नागरिकांना मिळते आयुष्मान कार्ड, पण याचा लाभ नेमका कोणाला मिळतो, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

 ‘गुड फ्रायडे’ म्हणजे नेमकं काय?

५ लाखांपर्यंत आरोग्य उपचारांचा आधार


या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना तब्बल ५,००,००० रुपयांपर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध होतात. विशेष बाब म्हणजे, सप्टेंबर २०२४ मध्ये सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक, त्यांचे उत्पन्न काहीही असो, आयुष्मान योजनेत समाविष्ट झाले आहेत. या वयोवृद्धांना आयुष्मान वय वंदन कार्ड प्रदान करण्यात आले आहे, जे त्यांच्यासाठी आरोग्य सेवेचा भक्कम आधार ठरेल.

अशी करा फार्मर आयडीमध्ये ऑनलाईन दुरुस्ती

कोणाला मिळतो आयुष्मानचा लाभ?

Who benefits from this scheme?

Ayushman Card Checklist 2025 in Marathi: आयुष्मान कार्ड हे प्रामुख्याने गरीब आणि गरजू लोकांना मोफत उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे, जे संघटित क्षेत्रात कार्यरत आहेत, आयकर भरतात, ESIC चा लाभ घेतात किंवा ज्यांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधी (PF) कापला जातो, ते या योजनेसाठी पात्र नाहीत. सामाजिक-आर्थिक आणि जात जनगणना (SECC-2011) मध्ये ज्या कुटुंबांचा समावेश आहे, त्यांना प्राधान्याने आयुष्मान कार्ड मिळते.


ग्रामीण भागातील कच्च्या घरात राहणारी कुटुंबे, ज्या कुटुंबात १६ ते ५९ वयोगटातील कोणताही पुरुष सदस्य नाही, अनुसूचित जाती आणि जमातीची कुटुंबे, तसेच भूमिहीन शेतमजूर या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर, शहरी भागातील कचरा वेचणारे, घरकाम करणारे, बांधकाम कामगार आणि रस्त्यांवरील छोटे विक्रेते यांसारख्या व्यवसायात गुंतलेली कुटुंबे देखील आयुष्मान योजनेसाठी पात्र ठरतात.

असं चेक करा तुमचं यादीतील नाव

Check your name on the list like this

Ayushman Card Checklist 2025 in Marathi: जर तुम्हालाही आयुष्मान कार्ड बनवायचे असेल, तर तुम्ही घरबसल्या तुमची पात्रता तपासू शकता. यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmjay.gov.in/.in/ ला भेट द्यावी लागेल. तिथे तुम्हाला ‘Am I Eligible’ हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर विचारलेली आवश्यक माहिती भरून तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही, हे तुम्हाला लगेच कळेल हा लेख जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर तुम्ही इतरांना देखील शेअर करू शकता.

आता कुणाचं रेशन कार्ड  होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?

Loading