Farmer Id Correction in Marathi: जाणून घ्या,स्टेप बाय स्टेप माहिती
Farmer Id Correction in Marathi: शेतकरी मित्रांनो, तुम्ही तयार केली आहे का फार्मर आयडी? राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण सुविधा सुरू केली आहे. आता या पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या फार्मर आयडीमधील (Farmer Id Correction) माहितीमध्ये घरबसल्या दुरुस्ती करता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा मोबाईल नंबर बदलणे किंवा नोंदणीमध्ये आणखी माहिती अपडेट करणे आता सहज शक्य होणार आहे. या सुविधेमुळे नोंदणी प्रक्रियेतील त्रुटी सुधारण्यास मदत होणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे जाईल.
Farmer Id Correction in Marathi: फार्मर आयडीमध्ये ऑनलाईन दुरुस्ती करण्याची प्रक्रिया (Farmer ID Online Correction Process in Marathi)
ॲग्रीस्टॅक पोर्टलवर (Agristack Portal) शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडीमधील (Farmer ID) माहितीमध्ये दुरुस्ती करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. या माध्यमातून शेतकरी स्वतःच्या मोबाईल नंबरसह इतर आवश्यक माहितीमध्ये बदल करू शकतात.
दुरुस्ती करण्याची गरज
Need for repair
Farmer Id Correction in Marathi: अनेक शेतकरी फार्मर युनिक आयडी (Farmer Unique ID) काढण्यासाठी ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करत आहेत.
नोंदणी करताना मोबाईल नंबर चुकणे किंवा बदलण्याची आवश्यकता निर्माण होणे.
एकापेक्षा जास्त शेती गट (landholding groups) असून नोंदणीमध्ये फक्त एकाच गटाचा समावेश करणे.
नोंदणी केलेल्या माहितीमध्ये इतर काही त्रुटी असणे.
ॲग्रीस्टॅक पोर्टलवर दुरुस्तीची उपलब्धता आहे.
आता ॲग्रीस्टॅक पोर्टलवर शेतकऱ्यांना स्वतःचा मोबाईल नंबर आणि इतर माहिती अपडेट करण्याची सुविधा मिळाली आहे.
यामुळे नोंदणीमध्ये झालेल्या चुका सुधारणे किंवा नवीन माहिती समाविष्ट करणे शक्य झाले आहे.

अशी दुरुस्ती करा
- सर्वप्रथम तुम्ही अधिकृत अधिकृत वेबसाईटला भेट द्या https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/
- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला पोर्टलवर ‘फार्मर लॉगिन’ farmer login चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- तुमचा मोबाईल नंबर आणि ओटीपी (OTP) किंवा मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
- अशी नोंदणीची माहिती तपासा
- लॉगिन केल्यानंतर शेतकऱ्याने नोंदणी केलेली सर्व माहिती (नाव, पत्ता, वय इत्यादी) स्क्रीनवर दिसेल.
- अशी नोंदणीची स्थिती तपासा
- ‘चेक एनरोलमेंट स्टेटस’ (Check Enrollment Status) या पर्यायावर क्लिक करा.
- याद्वारे आपल्या नोंदणीची सध्याची स्थिती (Enrolment ID किंवा Central ID प्राप्त झाला आहे की नाही) कळेल.
- माहिती अपडेट करा
- ‘अपडेट माय इन्फॉर्मेशन’ (Update My Information) हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- केवायसी (KYC) तपशील अपडेट करा (मोबाईल नंबर बदलणे) जसे की,मोबाईल नंबर बदलण्यासाठी ‘केवायसी डिटेल्स’ मध्ये जा.
- जुना मोबाईल नंबर टाका, त्यावर एक ओटीपी येईल तो प्रविष्ट करून व्हेरिफाय करा.
- नवीन मोबाईल नंबर टाका आणि त्यावर आलेला ओटीपी प्रविष्ट करून तो देखील व्हेरिफाय करा.
- अशा प्रकारे नवीन मोबाईल नंबर अपडेट होईल.
- जमिनीची अतिरिक्त माहिती समाविष्ट करा
- नवीन जमीन समाविष्ट करण्यासाठी ‘ऍड न्यू लँड’ (Add New Land) या पर्यायावर क्लिक करा.
- Farmer Id Correction in Marathi: जमिनीच्या मालकी हक्कासंबंधी आवश्यक माहिती भरा.
खुशखबर! तुमच्या गावांतील कोणत्या शेतकऱ्याला मिळालं अनुदान?
अशी करा जमिनीच्या माहितीत दुरुस्ती
- जमिनीच्या माहितीत काही बदल करायचा असल्यास, ‘अपडेट माय इन्फॉर्मेशन’ (Update My Information) मध्येच आवश्यक पर्याय उपलब्ध असतील.
लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
- Farmer Id Correction in Marathi: सध्या ‘अपडेट माय इन्फॉर्मेशन’ अंतर्गत नवीन जमीन समाविष्ट करणे आणि जमिनीच्या माहितीत दुरुस्ती करणे शक्य आहे.
- केवायसीमध्ये (उदा. मोबाईल नंबर बदलणे) बदल करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
- ओटीपी (OTP) द्वारे पडताळणी करणे आवश्यक आहे.
- या माहितीच्या आधारे शेतकरी आता ॲग्रीस्टॅक पोर्टलवर त्यांच्या फार्मर आयडीमधील आवश्यक माहितीमध्ये स्वतःहून दुरुस्ती करू शकतील.
रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ
आता कुणाचं रेशन कार्ड होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?
शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?