Job Card 2025 in Marathi;घरकुल योजनेसाठी सोपी आणि जलद मार्गदर्शिका!
Job Card 2025 in Marathi; नमस्कार, घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी जॉब कार्ड (Job Card) असणे अनिवार्य आहे, पण अनेकांना हे कसे काढायचे हे समजत नाही.तुमच्या वेळेची आणि मेहनतीची कदर करत, या लेखांमध्ये एकदम सोपी आणि जलद अशी प्रक्रिया सांगत आहोत जी घरबसल्या, फक्त दोन मिनिटांत तुम्हाला तुमचं जॉब कार्ड मिळवून देईल.
या मार्गदर्शिकेमध्ये तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची माहिती, अर्ज कसा करायचा, जॉब कार्ड नंबर कसा मिळवायचा आणि ते कसे डाउनलोड करायचे याची सविस्तर माहिती मिळेल. मग कशासाठी वाट बघताय? चला तर मग, आजच या सोप्या पद्धतीने जॉब कार्ड काढून सरकारच्या घरकुल योजनेचा फायदा घ्या!
जॉब कार्ड मुळे तुम्हाला विविध सरकारी योजनांचा लाभ घेता येईल. जर तुम्हाला घरकुल योजनेसाठी फॉर्म भरायचा असेल, तर जॉब कार्ड आवश्यक आहे. खालील प्रक्रिया अनुसरा.

आवश्यक कागदपत्रे कोणती?
important document
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- जॉब कार्डचा फॉर्म
हे पहा >>>>>>सामान्य नागरिकांनी काय करायचे?

जॉब कार्ड काढण्याची प्रक्रिया कशी आहे?
ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करा
Job Card 2025 in Marathi; तुमच्या स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात जा.
आवश्यक कागदपत्रे आणि माहिती भरून अर्ज द्या.
अर्ज ग्रामरोजगार सेवकाकडे (MNREGA) जमा करा.
अर्ज सादर केल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला जॉब कार्डचा नंबर दिला जाईल.
जॉब कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया
Application process
- सर्वप्रथम Maharashtra NREGA या संकेतस्थळावर भेट द्या.
- “Generate Reports” या पर्यायावर क्लिक करा.
- आता दिलेल्या राज्यांमधून “महाराष्ट्र” निवडा.
- त्यात विचारलेल्या माहितीनुसार वर्ष, तालुका, ब्लॉक, पंचायत यासारखी माहिती भरा.
- “Proceed” या पर्यायावर क्लिक करा.
- “R1 job registration” या कॉलममध्ये “Job card/employment register” वर क्लिक करा.
- तुमच्या गावातील जॉब कार्ड बनवलेल्या व्यक्तींची नावे आणि त्यांचे जॉब कार्ड नंबर दिसतील.
- तुमचे नाव शोधा आणि तुमच्या नावासमोर असलेला जॉब कार्ड नंबर सुरक्षितपणे लिहून ठेवा.
- जॉब कार्ड डाउनलोड करा:
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही जॉब कार्ड डाउनलोड करू शकता. ही माहिती शेअर करू शकतो.