Kisan Vikas Patra Yojana in Marathi;
जाणून घेऊया सविस्तर माहिती
Kisan Vikas Patra Yojana in Marathi; नमस्कार,पोस्ट ऑफिसच्या अनेक बचत योजना आहेत, ज्या सुरक्षित गुंतवणुकीसह चांगला परतावा देतात. यापैकीच एक लोकप्रिय योजना म्हणजे किसान विकास पत्र (KVP). या योजनेत तुम्ही गुंतवलेले पैसे विशिष्ट कालावधीनंतर दुप्पट होतात. जर तुम्ही सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी गुंतवणूक शोधत असाल, तर ही योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
या योजनेविषयी आपण या लेखांमध्ये माहिती घेऊया जसे की या योजनेची वैशिष्ट्ये,खाते कसे उघडावे,त्याकरिता तुम्ही हा लेख संपूर्ण वाचा.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
features
- या Kisan Vikas Patra Yojana योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षित गुंतवणूक. ही योजना भारत सरकारद्वारे समर्थित आहे, त्यामुळे तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे.
- तसेच,आकर्षक व्याज दर मिळत असून सध्या या योजनेवर ७.५ % वार्षिक चक्रवाढ व्याज मिळते.
- या योजनेत गुंतवलेले पैसे ११५ महिन्यांमध्ये म्हणजे (९वर्षे आणि ७ महिने) दुप्पट होतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही ₹५ लाख गुंतवले, तर तुम्हाला ₹१० लाख मिळतील.
- तुम्ही या योजनेत फक्त ₹१००० पासून गुंतवणूक सुरू करू शकता.
- जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. या योजनेत तुम्ही कितीही रक्कम गुंतवू शकता. ₹१०० च्या पटीत तुम्ही तुमची गुंतवणूक वाढवू शकता.
- तुम्ही हे खाते दोन किंवा तीन व्यक्तींसोबत संयुक्त खाते (Joint Account) मिळून उघडू शकता.
- या योजनेत नॉमिनीची (Nominee) सुविधा देखील उपलब्ध आहे.
- लहान मुलांसाठी खाते: १० वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले स्वतःच्या नावाने KVP खाते उघडू शकतात.

“ऐकलं का मंडळी! राज्य सरकारने आता लाडक्या सुनेसाठी देखील ‘लाडकी सून योजना’ सुरू केली आहे.
कसे उघडावे खाते?
How to open an account
- किसान विकास पत्र खाते उघडणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल आणि खालील गोष्टींची पूर्तता करावी लागेल:
- पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असलेला अर्ज भरा.
- तुम्ही गुंतवू इच्छित असलेली रक्कम रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे जमा करा.
- अर्जासोबत तुमचे ओळखपत्र जोडा.
या योजनेचे फायदे
Benefits
- Kisan Vikas Patra Yojana in Marathi; या योजनेत तुम्हाला चक्रवाढ व्याज मिळते, म्हणजेच तुमच्या व्याजावरही व्याज जोडले जाते. यामुळे तुमच्या गुंतवणुकीची किंमत वेगाने वाढते.
- खाते उघडण्याची आणि गुंतवणूक करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे.
- ही एक सरकारी योजना असल्यामुळे गुंतवणुकीची सुरक्षा १००% आहे.
- ही एक छोटी बचत योजना असल्यामुळे, सरकार दर तीन महिन्यांनी व्याजदराचा आढावा घेते आणि त्यात आवश्यकतेनुसार बदल करते. यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी नवीनतम व्याजदर तपासणे महत्त्वाचे आहे.
- Kisan Vikas Patra Yojana in Marathi; तुम्हीही चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर किसान विकास पत्र योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. माहिती योग्य वाटल्यास तुम्ही ही माहिती इतरांना देखील शेअर करू शकता.
आजपासून FASTag चा वार्षिक पास सुरू