Ladki Sunbai Yojana in Marathi:”ऐकलं का मंडळी! राज्य सरकारने आता लाडक्या सुनेसाठी देखील ‘लाडकी सून योजना’ सुरू केली आहे.

Ladki Sunbai Yojana in Marathi:जाणून घेऊया सविस्तर माहिती

Ladki Sunbai Yojana in Marathi: सुनबाई, आता तुम्ही देखील आनंदी आणि सुरक्षित राहाल. ‘लाडकी सून योजने’च्या माध्यमातून राज्य सरकार तुमची काळजी घेणार आहे. सासरच्या जाचाला बळी पडलेल्या महिलांना या (Ladki Sunbai Yojana)योजनेतून मोठा आधार मिळणार आहे.
चला तर मग,’लाडकी सून योजना’ या आज याविषयी जाणून घेऊया माहिती जी तुम्हाला नक्कीच उपयोग पडेल त्यासाठी तुम्ही हा लेख संपूर्ण वाचा.


महाराष्ट्रात घरगुती हिंसाचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी, राज्य सरकारने एक महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे. ‘लाडकी बहीण योजने’च्या यशस्वीतेनंतर आता ‘लाडकी सून योजना’ सुरू करण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश सासू आणि सून यांच्यातील संबंध सुधारणे तसेच पीडित सुनांना योग्य मदत करणे हा आहे. या उपक्रमांतर्गत, शारीरिक आणि मानसिक छळाला बळी पडणाऱ्या महिलांना तात्काळ मदत पुरवण्यासाठी एक विशेष हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे.

”आयुष्मान कार्डवर ५ लाख रुपये मोफत उपचार! तुम्ही पात्र का? 


Ladki Sunbai Yojana in Marathi: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात ‘लाडकी सून योजना’ सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश, समाजात प्रत्येक सुनेला ‘लाडकी मुलगी’प्रमाणे सन्मान मिळावा, हा आहे. घरगुती हिंसाचाराचा सामना करणाऱ्या महिलांसाठी ही योजना मदतीचा हात देईल.
हेल्पलाइन क्रमांक आणि मदतीची प्रक्रिया


या योजनेसाठी एक विशेष हेल्पलाइन क्रमांक 8828862288 जारी करण्यात आला आहे.

या क्रमांकावर पीडित महिला संपर्क साधू शकतात. या मोहिमेत शिवसेनेच्या शाखा आणि कार्यालयेही सहभागी होणार आहेत. सुरुवातीला समुपदेशनाद्वारे कुटुंबांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केला जाईल. जर ही पद्धत अयशस्वी ठरली, तर पुढील कायदेशीर मदत दिली जाईल.
यावेळी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे म्हटले की, “जशी आपली मुलगी असते, तशीच सूनही असते. तिलाही सन्मानाने वागवले पाहिजे. अनेक घरांमध्ये सुनांवर अत्याचार होतात, त्यांना त्रास दिला जातो. याला आळा घालण्यासाठी आम्ही ही योजना सुरू केली आहे.”

या योजनेत खास काय आहे?

Ladki Sunbai Yojana in Marathi:"ऐकलं का मंडळी! राज्य सरकारने आता लाडक्या सुनेसाठी देखील 'लाडकी सून योजना' सुरू केली आहे.


Ladki Sunbai Yojana in Marathi: या योजनेत केवळ पीडित सुनांनाच मदत केली जाणार नाही, तर चांगल्या सासूंचाही सन्मान केला जाईल, जेणेकरून समाजात सकारात्मक संदेश पसरेल. राज्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे या योजनेची राज्यस्तरावरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही मोहीम राज्यभर राबवली जाणार असून, प्रत्येक शिवसेना शाखेतून पीडित महिलांना मदत केली जाईल. ही योजना महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांना समाजात सन्मान मिळवून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

शून्य खर्चात करा पत्नीच्या नावे शेतजमीन – लक्ष्मी मुक्ती योजनेचा लाभ घ्या!

Loading