Mahamandal Yojana Update 2025 In Marathi: युवकांसाठी व्यवसाय कर्ज योजना!
Mahamandal Yojana Update 2025 In Marathi: नमस्कार वाचकहो, युवकांना १० लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज मिळवता येते? तुम्हाला माहिती आहे का ही योजना. इतर मागास वर्ग महामंडळाने होतकरू युवकांना उद्योग आणि व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना राबविल्या आहेत.
आज या लेखामध्ये आपण पाहणार आहोत ही बीज भांडवल महामंडळ योजना आहे तरी काय? या योजनेचे लाभ काय? तसेच प्रक्रिया काय असते हे पाहूया.
नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की त्याला पैशाची आवश्यकता असते. अनेक युवक हे या समस्याला तोंड देतात, अनेक युवकांमध्ये अनेक गोष्टीची कौशल्य असते परंतु आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याकारणाने ते आपला व्यवसाय सुरू करू शकत नाही किंवा त्यांना आवश्यक निधी हा मिळत नाही.
इतर मागास वर्गातील युवकांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी सवलतीत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या कर्ज योजनेचा लाभ युवकांनी घ्यावा आणि उद्योग स्थापन करून स्वावलंबी बनावे. ही एक सुवर्णसंधी आहे, जी युवकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यास मदत करेल. ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा देखील आहे. त्यामुळे युवक गावातूनच कर्जासाठी अर्ज करू शकतात.
काय आहे महामंडळाची बीज भांडवल योजना?
What is the Corporation Scheme?
या योजनेअंतर्गत २० टक्के बीजभांडवल महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते, तर ७५ टक्के बँक कर्ज मिळते. लाभार्थ्याला फक्त ५ टक्के रक्कम भरावी लागते. यामुळे युवकांना उद्योगासाठी आवश्यक निधी मिळवणे सोपे होते.
या संदर्भातील अधिक माहितीसाठी तुम्ही या वेबसाईटला भेट द्या
https://mpbcdc.maharashtra.gov.
गटासाठी कर्ज
गावातील महिला किंवा पुरुष एकत्र येऊन उद्योग स्थापन करण्याची तयारी करत असतील, तर त्यांना महामंडळामार्फत ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यामुळे सहकार्याने उद्योग स्थापन करण्याची संधी मिळते.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
Apply online
कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली आहे. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कर्ज मिळवणे शक्य होते. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतरच महामंडळाच्या इतर योजनांचा लाभ घेता येतो.
आता घरबसल्या करा वारस नोंद, 7/12 उताऱ्यावर जोडा तुमचे नाव!
तुम्हाला याची माहिती आहे का? हे देखील वाचा.
तुम्ही केला आहे का अर्ज पाईपलाईन योजनेसाठी!
घरकुल साठी मिळणार आता 2 लाख 10 हजार रुपये!
आता घरबसल्या पहा पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आजपासून जमा!
शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?
थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!