MHADA Lottery 2025 apply online: MHADA लॉटरी अर्ज प्रक्रियेची STEP-BY-STEP माहिती
MHADA Lottery 2025 apply online: स्वतःच घर असणं हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं, हेच घरात स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करण्याची ही एक सुवर्णसंधी.महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA Lottery ) कोकण विभागाने ५,६३२ सदनिका आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्ट २०२५ आहे.
MHADA Lottery 2025 apply online:म्हाडा आणि सिडकोसारख्या सरकारी संस्थांकडून परवडत्या दरात उपलब्ध होणाऱ्या घरांमुळे दरवर्षी हजारो महत्वाकांक्षी गृहखरेदीदार या योजनांकडे आशादायक दृष्टीने पाहतात. अलीकडेच, MHADA कोकण गृहनिर्माण मंडळाने ठाणे शहर आणि जिल्ह्यातील भूखंडांच्या वितरणासाठी लॉटरी जाहीर केली आहे.
MHADA Lottery 2025 apply online: १४ जुलै २०२५ पासून सुरू झालेल्या या अर्ज प्रक्रियेमध्ये अत्यल्प,अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील सर्व पात्र महाराष्ट्र रहिवासी सहभागी होऊ शकतात, अनेक नागरिकांना.योग्य माहिती नसल्यामुळे अनेकजण या योजनेपासून वंचित राहतात. त्यामुळे, आपण आजी लेखांमध्ये याविषयी संपूर्ण माहिती घेऊया जसे की,पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखांचा तपशीलवार आढावा पाहूया.
ऐकलं का? आता एटीएम कार्ड नसतानाही पैसे काढता येतात!
कोण अर्ज करू शकतो?
(Eligibility Criteria)
MHADA Lottery 2025 apply online: रहिवासी फक्त महाराष्ट्राचे नागरिक असणे आवश्यक आहे. (नोंदणीकृत रहिवासी असणे आवश्यक).
अर्जदाराचे किमान वय हे १८ वर्षे पूर्ण झालेले असावे.
खालीलपैकी कोणत्याही एका गटात येणे आवश्यक आहे
अत्यल्प: २५,०० पर्यंत
अल्प : २५,००१ ते ५०,०००
मध्यम : ५०,००१ ते ७५,०००
उच्च उत्पन्न :७५,००१ किंवा अधिक
अर्ज कसा करावा?
(Apply Online)
1. दिलेल्या अधिकृत वेबसाइट [www.mhada.gov.in](https://www.mhada.gov.in) वर जा.
2. नोंदणी नवीन वापरकर्ता म्हणून रजिस्टर करा.
3. फॉर्म भरा आवश्यक दस्तऐवज (आधार, पत्ता पुरावा, इन्कम प्रूफ) अपलोड करा.
4. फी भरा अर्ज शुल्क ऑनलाइन (डेबिट/क्रेडिट कार्ड, UPI) भरा.
5. अर्ज सबमि: १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण करा.
महत्त्वाच्या तारखा
(Key Dates)
MHADA Lottery 2025 apply online: अर्ज सबमिशन शेवटची तारीख : १३ ऑगस्ट २०२५ (रात्री ११:५९)
ठेव रक्कम भरण्याची शेवटची तारीख:१४ ऑगस्ट २०२५ (रात्री 11:59)
पात्र उमेदवारांची पहिली यादी: २१ ऑगस्ट २०२५ (संध्याकाळी 6:00)
दावे आणि आक्षेप सबमिट करणे:२५ ऑगस्ट २०२५ (संध्याकाळी ६:००)
अंतिम यादी जाहीर :१ सप्टेंबर २०२५ (संध्याकाळी ६:००)
लॉटरी ड्रॉ ३ सप्टेंबर २०२५ (सकाळी १०:००) काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात लॉटरीचा ड्रॉ काढण्यात येईल.
महत्त्वाचे टिप्स
(Important Tips)
ही आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा
- आधार,
- पॅन कार्ड,
- पगार पर्ची/ITR,
- पत्ता पुरावा.
- पासपोर्ट सायज फोटो (५० KB पेक्षा कमी).
- एकापेक्षा जास्त अर्ज अयोग्य ठरतील.
- अधिकृत साइटवरूनच करा( तृतीय-पक्षांच्या साइट्सवर फसगत टाळा).
लॉटरी नंतरची प्रक्रिया
(After Lottery)
MHADA Lottery 2025 apply online: विजेत्यांना ई-मेल/SMS द्वारे सूचित केले जाईल.
१५ दिवसांच्या आत घराची रक्कम भरावी लागेल.
तसेच,जागा न पटल्यास, रक्कम परत मिळेल (MHADA च्या नियमांनुसार).
महत्वपूर्ण टीप: अधिक माहितीसाठी, MHADA हेल्पलाइन (1800-120-8040) किंवा जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधा