Pipeline Yojana 2025 Update: अर्ज प्रक्रिया आणि अनुदानाची संपूर्ण माहिती!
Pipeline Yojana 2025 Update: राज्य सरकारची पाईपलाईन योजना शेतकऱ्यांना जलसंपत्तीचे व्यवस्थापन करण्याकरिता एक महत्त्वपूर्ण योजना राबवली आहे. जी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ करण्यास मदत करते. ती योजना म्हणजे पाईपलाईन योजना.
गेल्या काही दिवसांपासून महाडीबीटी पोर्टलवरील लॉटरी प्रक्रियेत अडचणी आल्या होत्या, परंतु आता काही योजनांच्या लॉटरी लागण्यास सुरुवात झाली आहे. सिंचन विभागातील योजनांची लॉटरी लागण्यास सुरुवात झाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना देखील राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अनुदानांची सुविधा उपलब्ध आहे.या योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी असून ही योजना म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण संधी असून यामध्ये शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक असलेले असलेल्या पाईप साठी अनुदान मिळवता येते योग्य कागदपत्रे सादर करून आणि योग्य ती प्रक्रिया करून शेतकरी मित्राला नक्कीच लाभ मिळेल.
पाइपलाइन योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी आहे, ज्यामुळे त्यांना सिंचनासाठी आवश्यक असलेल्या पाईपसाठी अनुदान मिळवता येईल. योग्य कागदपत्रे सादर करून आणि प्रक्रियांचे पालन करून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
जर तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल, तर महाडीबीटी पोर्टलवर किंवा स्थानिक कृषी कार्यालयात संपर्क साधा.
काय आहे पाईपलाइन योजना?
What is pipeline Yojana?
पाईपलाइन योजना ही एक सरकारी योजना असून या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक असलेले पीव्हीसी(PVC) आणि एचडीपी (HDP) पाईप साठी शासनाद्वारे अनुदान मिळते.
योजनेची वैशिष्ट्ये
Features
पीव्हीसी पाईपसाठी 100% अनुदान उपलब्ध आहे, ज्यामध्ये 428 रुपये प्रति मीटरपर्यंत अनुदान दिले जाते.
एचडीपी पाईपसाठी सामान्य गटातील शेतकऱ्यांना 50 रुपये प्रति मीटर आणि पीव्हीसी पाईपसाठी 35 रुपये प्रति मीटर अनुदान दिले जाते.
एसटी आणि एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना 100% अनुदान मिळते.
पाईपलाइन योजनेचा उद्देश काय?
Purpose
राज्यातील शेतकऱ्यांना जलसंपदा संस्थापनात मदत करणे. तसेच, राज्यातील शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढ करणे असून, या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना सिंचनाच्या साधनांची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि त्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ करणे आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामात मदत मिळते आणि त्यांचे आर्थिक स्थैर्य वाढते.
पात्रता
Eligibility
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे.
पात्र शेतकऱ्यांना मेसेजद्वारे कळवले जाईल की त्यांनी कागदपत्रे अपलोड करावी.
कागदपत्रांची आवश्यकता
Important document
आधार कार्ड
बँकेचे पासबुक
सातबारा उतारा
अर्ज कसा कराल
How to Apply
शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो.
https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
अर्ज भरण्यानंतर निवड लॉटरी पद्धतीने केली जाते.
लॉटरी दर 2-3 महिन्यातून एकदा घेतली जाते.
लॉटरीमध्ये निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना एक मेसेज प्राप्त होतो.मेसेज प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करणे आवश्यक आहे.
लॉगिन केल्यानंतर “कागदपत्रे अपलोड करा” या पर्यायावर क्लिक करावे.
आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला काही दिवसांत पूर्वसंमती दिली जाते.
पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशातून पीव्हीसी पाईप खरेदी करणे आवश्यक आहे.
खरेदी केलेल्या पाईपचे बिल जीएसटी पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे.
८ ते १० दिवसांनी कृषी विभागाचे अधिकारी पाईप पाहण्यासाठी येतात.
अधिकारी व्हेरिफिकेशन करून घेतात.
पाईपलाइनची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनुदान शेतकऱ्यांच्या दिलेल्या बँक खात्यात जमा केले जाते.
Pipeline Yojana 2025 Update: तुम्ही केला आहे का अर्ज पाईपलाईन योजनेसाठी!
आता घरबसल्या पहा पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आजपासून जमा!
शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?
थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!
हक्काची पेन्शन! PM श्रमयोगी मानधन योजना तुमच्या कुटुंबासाठी!