PM Internship Yojana New Update 2025: जाणून घेऊया सविस्तर माहिती.
PM Internship Yojana New Update 2025: नमस्कार, तुम्हाला पीएम इंटरनॅशनल योजनेमध्ये अर्ज करायचा आहे? काळजी नको,आता घरबसल्या करा अर्ज. तरुणांच्या स्वप्नांना नवी भरारी देण्यासाठी आणि त्यांच्या करिअरला योग्य दिशा देण्यासाठी पंतप्रधान इंटर्नशिप योजना (PMIS) सज्ज झाली आहे. नुकतेच, देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी या योजनेसाठी एक विशेष मोबाईल ॲप लॉन्च करण्यात आले आहे.
ज्यामुळे तरुणांना इंटर्नशिपच्या संधी मिळवणे अधिक सोपे झाले आहे. हे ॲप तरुणांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्यांना धार देण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ प्रदान करते. या आधारे तुम्ही पीएम इंटरसिटी योजने मध्ये अगदी सोप्या पद्धतीत नोंदणी करू शकता, युजर फ्रेंडली इंटरफेसमुळे ॲप वापरणे अत्यंत सोपे आहे. या ॲपद्वारे, तरुण त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात, त्यांच्या सोयीनुसार इंटर्नशिपच्या संधी शोधू शकतात आणि अर्ज करू शकतात. रिअल-टाइम सूचना आणि अपडेट्समुळे तरुणांना योजनेसंबंधित सर्व माहिती मिळत राहते. या ॲपच्या माध्यमातून, तरुणांना केवळ इंटर्नशिपची संधीच मिळणार नाही, तर त्यांच्या करिअरला एक नवी दिशा मिळेल, यात शंका नाही.
PM Internship Yojana New Update 2025: देशाच्या विकासात तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तरुणांना योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देऊ शकतात. याच दृष्टीने, केंद्र सरकारने ‘पंतप्रधान इंटर्नशिप योजना’ (PMIS) सुरू केली आहे. या योजनेद्वारे तरुणांना देशातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. नुकतेच या योजनेसाठी एक मोबाईल ॲप देखील लॉन्च करण्यात आले आहे, ज्यामुळे तरुणांना अर्ज करणे अधिक सोपे झाले आहे.
तर आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत या याबद्दल थोडक्यात महत्वपूर्ण माहिती तसेच ॲप बद्दल विशेष अशी माहिती.
“बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी: प्रत्येक महिन्याला ५००० रुपये! अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू!”

योजनेचा लाभ काय?
Benefits
तरुणांना उद्योगक्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल, ज्यामुळे त्यांची रोजगारक्षमता वाढेल.
तरुणांना नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळेल, ज्यामुळे त्यांचे करिअर घडण्यास मदत होईल.
उद्योगक्षेत्रातील लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल, ज्यामुळे भविष्यात नोकरी मिळवणे सोपे होईल.
योजनेत सहभागी होण्यासाठी:
पात्र तरुणांनी मोबाईल ॲप किंवा https://pminternship.mca.gov.in/login
या पोर्टलद्वारे अर्ज करावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2025 आहे.
योजनेची उद्दिष्ट्ये
PM Internship Yojana New Update 2025: देशातील तरुणांना उद्योग क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी तसेच वर्गातील शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील प्रात्यक्षिक शिक्षण जो फरक आहे तो तरुणांना अनुभवता येईल. या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली असून त्यामुळे तरुणांमध्ये रोजगार क्षमता देखील वाढेल. तसेच आपल्या देशात कुशल असे मनुष्यबळ देखील तयार होईल.
या योजनेचे वैशिष्ट्ये काय?
What are the features this scheme?
PM Internship Yojana New Update 2025: या पीएम इंटरशिप योजनेअंतर्गत देशातील तरुणांना 12 महिन्याचे निषुल्क इंटरशिप करता येईल तसेच देशातील नामांकित 500 कंपन्यांमध्ये इंटरशिप करण्याची सुवर्णसंधी ही मिळणार आहे.आणि आघाडीवर असलेल्या कंपन्यांमध्ये
वयवर्ष 21 ते 24 या वयोगटातील तरुणांना या योजनेचा मुख्यत्वे लाभ घेता येणार असून या योजनेअंतर्गत इंटर्नला पाच हजार रुपये आणि एक वेळेचे सहा हजार रुपये एवढी आर्थिक साह्य देखील मिळणार आहे.
अर्ज प्रक्रिया ही अतिशय सुलभ होण्याकरिता या मोबाईल ॲप लॉन्च करण्यात आला आहे.

ॲपची वैशिष्ट्ये काय?
What are the features of the App?
या मोबाईलच्या आधारे फेस प्रणाली द्वारे सोपे नोंदणी होणार असून सुलभाचे नेविगेशन म्हणजेच तुमच्या स्थान इत्यादीनुसार तुमच्याकरिता संधी शोधण्याची सुविधा देखील मिळणार आहे.
वैयक्तिक तुमच्या अर्जाची स्थिती पाहण्याची देखील सुविधा या ॲपमध्ये असणार आहे तसेच नवीन अपडेट्स किंवा नवीन येणाऱ्या संख्यांची देखील तुम्हाला माहिती मिळणार आहे.
ॲपद्वारे तरुणांना इंटर्नशिप योजनेसंबंधित सूचना आणि अपडेट्स मिळतील.
नवीन इंटर्नशिप संधी, अर्जाची स्थिती आणि इतर महत्त्वाची माहिती तरुणांना ॲपद्वारे मिळेल.
रेफरल योजना:
तसेच या ॲपमध्ये इथे योजना उपलब्ध आहे ज्यामुळे नोंदणीकृत तरुणांना इतर पात्र उमेदवारांना योजनेसाठी रेफर करू शकतात. तसेच बक्षिसे जिंकू शकतील. तसेच या ॲप मध्ये प्रश्न उत्तर संपर्क माहिती आणि इतर माहिती देखील उपलब्ध असेल
हे पहा>>>>>भारत सरकारचे हे सात कार्ड आहेत का तुमच्याकडे?
अनुदान मिळवा! औषधी वनस्पतींच्या विकासासाठी केंद्र सरकारची ही योजना
महत्वाचे मुद्दे:
PM Internship Yojana New Update 2025: या योजनेअंतर्गत एक कोटी तरुणांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहे.
पायलट प्रकल्पाच्या पहिल्या फेरीत 1.27 लाख संधी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
पायलट प्रकल्पाची दुसरी फेरी सुरू झाली असून, 1.18 लाख संधी उपलब्ध आहेत.
या योजनेमुळे तरुणांना उद्योगक्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल आणि त्यांची रोजगारक्षमता वाढेल.
मोबाईल ॲपमुळे अर्ज प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे.
PM Internship Yojana New Update 2025: या ॲपमुळे पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होईल, ज्यामुळे जास्तीत जास्त तरुणांना या योजनेचा लाभ घेता येईल. जर हा लेख आपल्याला आवडला असेल आणि महत्त्वपूर्ण वाटत असेल तर हा लेख तुम्ही इतरांना देखील शेअर करू शकता.
PM Internship Yojana New Update 2025: १ कोटी कुटुंब होणार आता प्रकाशमान सूर्य घर योजनेतून
हे पहा>>>>> “शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी: सोलर कुंपण योजनेत 100% अनुदान!”