PM Kisan Yojana sathi Kaarane ani Upay: जाणून घ्या कारणे आणि उपाय!”
PM Kisan Yojana sathi Kaarane ani Upay: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) ही शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची योजना. परंतु, काही लाभार्थ्यांना बरेच दिवस झाले आहेत, या योजनेचे हप्ते मिळणे थांबले आहे. हप्ते थांबण्याची कारणे काय आहेत आणि त्यावर उपाय काय आहेत, याबद्दल अनेक शेतकऱ्यांना माहिती नसल्याकारणाने, अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. ही माहिती त्यांच्यासाठी हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम दर ४ महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल..चला, या लेखात आपण या समस्येचे सखोल विश्लेषण करूया आणि योग्य उपाययोजना कशा कराव्यात ते पाहूया.

पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू?
ही असू शकतात हप्ते थांबण्याची कारणे
Reasons
- जमिनीचे प्रमाणिकरण नसणे (Land Seeding)
- ईकेवायसी (eKYC) केलेली नसणे
- लाभार्थ्यांनी ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
- बँक खात्याला आधार क्रमांक लिंक केलेला नाही.
- बँक खाते DBT (Direct Benefit Transfer) साठी सक्षम केलेले नाही.
- आधार लिंक बँक खाते बंद असणे
- बँक खात्यावर दुसऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक लिंक केलेला आहे.
- नोंदणीनंतर आधार मध्ये दुरूस्ती केलेली नाही.
- लाभार्थ्याने नोंदणी केल्यानंतर आयकर भरणा केला आहे.
- लाभार्थ्याने स्वतःच योजनाचा लाभ समर्पित केला आहे.
- विविध कारणास्तव अर्ज अपात्र (Inactive) असणे
- लाभार्थी मयत झाल्यामुळे अर्ज अपात्र झाला आहे.
- नोंदणी केल्यानंतर जमिनीची विक्री झाल्यामुळे लाभार्थी भुमिहिन झाला आहे.
- बँकेकडून व्यवहार (Transaction Failure) नाकारणे.
हे उपाय करा
Solutions
PM Kisan Yojana sathi Kaarane ani Upay:महसुल विभागाशी संपर्क करून जमिनीचे प्रमाणिकरण करून येणे.
स्वतः, सीएससी किंवा गावातील कृषी सहायक यांच्या मार्फत ईकेवायसी करून घेणे.
बँक खाते आधार लिंक करून घेणे किंवा नजिकच्या पोस्टात DBT Enable खाते उघडणे.बँक खाते आधार लिंक करून घेणे किंवा नजिकच्या पोस्टात DBT Enable खाते उघडणे.
बँक खाते सुरू करून घेणे.
बँकेत जाऊन दुरूस्ती करून घेणे.
स्वतः किंवा सीएससी मार्फत पोर्टलवर आधार दुरूस्ती करून घेणे.
नोंदणी केल्यानंतर आयकर भरणा टाळा.
योजनाचा लाभ समर्पित न करणे
सर्व अधिकृत पुराव्यासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अपत्रता मागे घेण्याबाबत अर्ज करणे.
PM Kisan Yojana sathi Kaarane ani Upay: हे सांगितलेले काही कारणे आणि उपाय आपल्या शेतकरी मित्राला नक्कीच उपयोगी ठरतील जर तुम्हाला हा लेख महत्त्वपूर्ण वाटत असेल तर तुम्ही इतरांना देखील शेअर करू शकता.
PM Kisan Yojana sathi Kaarane ani Upay: “तुम्हाला एक्स्ट्रा सोलर पंप लावायचा आहे का?
उद्योगाचं स्वप्न? सरकार देणार ५० लाखांपर्यंत मदत!
:रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ
आता कुणाचं रेशन कार्ड होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?
शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?