PM Yuva 3.0 2025 in Marathi: लेखक बनायचंय? पीएम-युवा ३.० आहे ना!

PM Yuva 3.0 2025 in Marathi: जाणून घेऊया, पीएम युवा ३.०

PM Yuva 3.0 2025 in Marathi: नमस्कार वाचकहो,तुम्हाला लिहिण्याची आवड आहे का? लिखाण करायचे आहे का? मग हा लेख नक्की वाचा. शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने ११ मार्च २०२५ रोजी PM-YUVA 3.0 योजना सुरू केली आहे. भारतातील युवा लेखकांसाठी ही एक मोठी संधी आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या इच्छुक लेखकांना प्रशिक्षण देणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे हा आहे.

चला तर मग आज या लेखांमध्ये माहिती घेऊया पीएम युवा ३.० या संदर्भात संपूर्ण सविस्तर माहिती.

या योजनेचे उद्दिष्ट कोणते?

Purpose

आपल्या देशात विविध भाषांमध्ये असलेले साहित्य हे जागतिक स्तरावर पोहोचवणे आणि भारतातील वाचन आणि लेखन संस्कृतीला प्रोत्साहन देणे.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती?

Features

PM Yuva 3.0 2025 in Marathi: नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया (NBT) या योजनेची अंमलबजावणी करेल.

 २२ भारतीय भाषा आणि इंग्रजी भाषेत लेखन करण्यास प्रोत्साहन दिते.

PM Yuva 3.0 2025 in Marathi: लेखक बनायचंय? पीएम-युवा ३.० आहे ना!

निवड प्रक्रिया आणि टाइमलाइन

Selection process and Timeline

PM Yuva 3.0 2025 in Marathi: स्पर्धकांना १०,००० शब्दांचा पुस्तक प्रस्ताव सादर करण्यास सांगितले जाईल, ज्यामध्ये २०००-३००० शब्दांचा सारांश, एक प्रकरण योजना, ७०००-८००० शब्दांचे दोन-तीन नमुना प्रकरणे, आणि एक ग्रंथसूची व संदर्भ समाविष्ट असतील. एकूण ५० तरुण लेखकांची निवड केली जाईल: १० लेखक “राष्ट्र उभारणीत भारतीय डायस्पोराचे योगदान” या थीमसाठी, २० लेखक “भारतीय ज्ञान प्रणाली” साठी, आणि २० लेखक “आधुनिक भारताचे निर्माते” (१९५०-२०२५) साठी.

भारत सरकारचे हे सात कार्ड आहेत का तुमच्याकडे?

निवडलेल्या उमेदवारांची घोषणा मे ते जून २०२५ दरम्यान केली जाईल. त्यानंतर, ३० जून ते ३० डिसेंबर २०२५ दरम्यान मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला जाईल. २०२६ मध्ये नवी दिल्ली येथे जागतिक पुस्तक मेळ्यात लेखकांसाठी एक राष्ट्रीय शिबिर आयोजित केले जाईल.

या उपक्रमाद्वारे, भारताच्या विविध पैलूंवर विचार करणाऱ्या तरुण लेखकांना एक अद्वितीय व्यासपीठ मिळेल, ज्यामुळे त्यांच्या विचारांची गती वाढेल आणि भारतीय ज्ञान प्रणालीला एक नवा आयाम मिळेल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: १० एप्रिल २०२५.

अनुदान मिळवा! औषधी वनस्पतींच्या विकासासाठी केंद्र सरकारची ही योजना

योजनेचे फायदे

Benefits

 युवा लेखकांना प्रस्थापित लेखकांकडून मार्गदर्शन मिळेल.

 साहित्यिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.

समकालीन चर्चासत्रात योगदान देण्याची संधी मिळेल.

  निवडलेल्या लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन आणि भाषांतर केले जाईल.

योजनेचे महत्त्व

PM Yuva 3.0 2025 in Marathi: ही योजना भारतातील युवा लेखकांना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी आणि त्यांच्या लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. या योजनेमुळे भारतीय साहित्याला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळेल.

इतर माहिती:

PM Yuva 3.0 2025 in Marathi: या योजनेअंतर्गत, निवडलेल्या लेखकांना त्यांच्या पुस्तकांवर काम करण्यासाठी आर्थिक सहाय्य देखील मिळेल.राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने, हा उपक्रम तीन प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित करेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या >>>> http://nbtindia.gov.in/

हे पहा>>>>>१ कोटी कुटुंब होणार आता प्रकाशमान सूर्य घर योजनेतून

हे पहा>>>>> “शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी: सोलर कुंपण योजनेत 100% अनुदान!”

Loading