Shet tale Plastic Anudan 2025: “शेततळ प्लास्टिक अस्तरीकरणासाठी सरकारचे १ लाख रुपयांचे अनुदान!”

Shet tale Plastic Anudan 2025: जाणून घेऊया या संदर्भातील सविस्तर माहिती..

Shet tale Plastic Anudan 2025: तुम्हाला शेतामध्ये शेततळे तयार करायचे आहेत का? पण प्लास्टिकचे अस्तरीकरण करण्याचा खर्च परवडत नाही? तर हा लेख नक्की वाचा. सरकार देत आहे अनुदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी १ लाख रुपये अनुदान मिळणार आहे. हे अनुदान तुम्हाला तुमच्या शेतीच्या विकासात मदत करेल. यामुळे तुम्हाला योग्य पाण्याची सुविधा मिळेल, उत्पादन वाढेल आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकता. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात वाढ करण्यासाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आवश्यक सिंचन सुविधांची निर्मिती करणे आहे, ज्यामुळे त्यांना योग्य पाण्याची सुविधा मिळेल. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल आणि ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. विशेषतः, या योजनेअंतर्गत शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी १ लाख रुपये अनुदान उपलब्ध आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या विकासात मदत मिळेल.

योजनेचा उद्देश

 What is the purpose of the scheme?

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक सिंचन सुविधांची निर्मिती करणे हा मुख्य उद्देश असून शेतकऱ्याला पाण्याचे योग्य ती सुविधा मिळवून त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत करणे तसेच आर्थिक पात्रता 

टायपिंग येते? मग मिळवा ₹६,५००,अमृत योजनेचा लाभ घ्या.

यासाठी पात्रता काय लागते?

Eligibility

Shet tale Plastic Anudan 2025: अर्जदार हा अनुसूचित जाती/नवबौद्ध शेतकरी असावा.

नवीन विहीरचा लाभ घेण्यासाठी किमान ०.४० हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक.

सामुहिक शेतजमीन किमान ०.४० हेक्टर धारण करणारे एकत्रित कुटुंब लाभ घेऊ शकते.

इतर घटकांसाठी किमान ०.२० हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक.

Shet tale Plastic Anudan 2025: कमाल शेतजमीन मर्यादा ६.०० हेक्टर.स्व. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जमीन वाटप झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य.

वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असावे.

उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांकडून मिळवावा लागेल.

ग्रामसभेची शिफारस आवश्यक आहे.

Shet tale Plastic Anudan 2025: "शेततळ प्लास्टिक अस्तरीकरणासाठी सरकारचे १ लाख रुपयांचे अनुदान!"

असा करावा अर्ज?

Apply like this

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागतो.
  • वेबसाईट mahadbt.maharashtra.gov.in/Farmer
  • ऑनलाईन अर्ज भरल्यावर लाभार्थीची निवड लॉटरी पद्धतीने होते.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक.
  • जिल्हास्तरीय समितीकडून मंजूरी मिळाल्यानंतर अनुदान मिळेल.

आवश्यक कागदपत्रे 

Important document

  • सातबारा दाखला आणि ८-अ उतारा.
  • ६ ड उतारा (फेरफार).
  • जात प्रमाणपत्र.
  • तहसीलदारांकडील उत्पन्नाचा दाखला.
  • आधार कार्डाची छायांकित प्रत.
  • बँक पासबुकाची छायांकित प्रत.

अशी करा तुमच्या पीएम किसान अर्जातील दुरुस्त!

“मोफत उपचारासाठी आजच आयुष्यमान कार्ड तयार करा!”

“90% अनुदानासह राज्य सरकारची ‘तार कुंपण योजना’

हे पहा>>>>>> “आता मोबाईल वरून पीएम इंटर्नशिप योजनेचा करा अर्ज” 

 अधिक माहितीसाठी

 या योजने संदर्भातील अधिक माहितीसाठी तुम्हाला जवळील कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल, तसेच कृषी अधिकारी पंचायत समितीकडे ही संपर्क साधावा.

Loading