Smart Meter Scheme 2025 in marathi: “स्मार्ट मीटरमुळे लाईट बिल वाढणार का?”

Smart Meter Scheme 2025 in marathi: जाणून घेऊया फायदे 

Smart Meter Scheme 2025 in marathi: नमस्कार,आजच्या युगात, अनेक ठिकाणी नवीन स्मार्ट वीज मीटर लावले जात आहेत. या बदलामुळे ग्राहकांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत, विशेषतः “आता लाईट बिल जास्त येणार का?” या चिंतेने सर्वांना ग्रासले आहे. परंतु, या लेखात आपण  Smart Meter Scheme योजनेतील अनेक फायदे आणि त्यासोबत ग्राहकांच्या मनातील शंकांचे निरसन कसे करावे, याबद्दल चर्चा करणार आहोत. महावितरणने या नव्या तंत्रज्ञानाबद्दल ग्राहकांना योग्य माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून ते या योजनेचा पूर्ण लाभ घेऊ शकतील. ग्राहकांच्या हितासाठी या योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होणे महत्त्वाचे आहे.

स्मार्ट प्रीपेड वीज मीटर म्हणजे काय? हे स्मार्ट मीटर कसे कार्य करतात? याचे फायदे काय आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखात शोधणार आहोत. त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा आणि स्मार्ट वीज मीटरच्या योजनेचा लाभ घेण्यास सज्ज व्हा!

“साडेतीन मुहूर्तापैकी शुभमुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया”

स्मार्ट मीटरची योजना

Smart Meter Scheme

Smart Meter Scheme 2025 in marathi: महावितरणच्या अंतर्गत 39,602 कोटींच्या वितरण क्षेत्र योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 1 कोटी 66 लाख ग्राहकांकडे स्मार्ट वीजमीटर बसविण्यात येणार आहेत. वितरण हानी अधिक असलेल्या भागात प्राधान्याने हे मीटर लागतील.

Smart Meter Scheme 2025 in marathi: "स्मार्ट मीटरमुळे लाईट बिल वाढणार का?"

स्मार्ट प्रीपेड वीज मीटर म्हणजे काय?

 What is a smart prepaid twenty meter?

स्मार्ट प्रीपेड वीज मीटर म्हणजे ग्राहकांना वीज वापरण्यासाठी मोबाईल रिचार्ज प्रमाणे रिचार्ज करावे लागेल. ग्राहक जेवढे पैसे भरतील, तेवढीच वीज वापरता येईल. या मीटरमध्ये ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती मोबाईल ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होईल.

“आयटीआर” भरण्याची अंतिम तारीख?

स्मार्ट मीटर कसे कार्य करते?

How does a smart meter  work?

  1. ग्राहकांनी जेवढे रिचार्ज केले आहे, तेवढीच वीज वापरता येईल.
  2. ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती मोबाईल ॲपद्वारे मिळेल.
  3. रिचार्ज संपल्यावर वीजपुरवठा स्वयंचलितपणे बंद होईल, ज्यामुळे ग्राहकांना पुन्हा रिचार्ज करणे आवश्यक असेल.

Smart Meter Scheme 2025 in marathi: राज्य सरकारने जुने वीजमीटर बदलून स्मार्ट मीटर लावण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेमुळे ग्राहकांमध्ये अनेक प्रश्न आणि शंका निर्माण झाल्या आहेत. 

Smart Meter Scheme 2025 in marathi: "स्मार्ट मीटरमुळे लाईट बिल वाढणार का?"

स्मार्ट मीटरचे फायदे

Benefits

  1. स्मार्ट मीटर मोबाईल सारखे रिचार्ज करता येतील.
  2. मीटर प्रिपेड आणि पोस्टपेड स्वरूपात उपलब्ध राहील.
  3. मीटर रिडिंगसाठी महावितरणला कर्मचारी पाठविण्याची गरज उरणार नाही.
  4. ग्राहकांना वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल.
  5. वीज वापरानुसारच बिल येईल, ज्यामुळे वीजचोरीवर आळा बसेल.
  6. वीज बिलातील त्रुटी दूर होऊन तक्रारी कमी होतील.
  7. मीटरमध्ये फेरफार झाल्यास त्याची सूचना मुख्यालयाला लगेच मिळेल.

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंका

  1. स्मार्ट मीटरची किंमत उच्च असू शकते.
  2. मीटरभाडे कसे आकारले जाईल, याबाबत स्पष्टता नाही.
  3. प्रिपेड ग्राहकांकडून इंधन अधिभार कसा आकारणार?
  4. उन्हाळ्यात इंधन अधिभार गृहित धरून अधिक दराने बील आकारणीची शक्यता.
  5. मीटरमध्ये फॉल्ट असल्यास पैसे गतीने संपण्याची शक्यता.
  6. मध्यरात्री अचानक रिचार्ज संपल्यास ग्राहकांना त्रास होऊ शकतो.
अधिक माहितीसाठी या अधिकृत महावितरण संकेतस्थळाला भेट द्या

Smart Meter Scheme 2025 in marathi:  “तुम्हाला एक्स्ट्रा सोलर पंप लावायचा आहे का?

 उद्योगाचं स्वप्न? सरकार देणार ५० लाखांपर्यंत मदत!

 रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ

आता कुणाचं रेशन कार्ड  होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?

शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

Loading