SSY New Interest Rate 2026: थोडक्यात, जाणून घ्या संपूर्ण माहिती
SSY New Interest Rate 2026: तुम्हाला तुमच्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक करायची आहे का? तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात.आपल्या लाडक्या लेकीचे शिक्षण आणि तिचे जीवन सुखकर व्हावे, तसेच तिच्या लग्नासाठी कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये आणि सर्वकाही थाटामाटात पार पडावे, असे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. पालकांची हीच चिंता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेअंतर्गत ‘सुकन्या समृद्धी योजना’ (SSY) सुरू केली आहे.
SSY New Interest Rate 2026: तुमच्या पैशांची पूर्ण सुरक्षितता आणि इतर कोणत्याही गुंतवणुकीपेक्षा जास्त व्याजदर देणारी ही सरकारची सर्वात लोकप्रिय योजना आहे. आजच्या या लेखात आपण २०२६ मधील नवीन व्याजदर, ही योजना नेमकी काय आहे आणि तुम्ही तुमच्या मुलीसाठी यात गुंतवणूक कशी करू शकता, याची संपूर्ण माहिती घेणार आहोत.
सुकन्या समृद्धी योजना २०२६, नवीन व्याजदर
(SSY Latest Interest Rate 2026)
भारत सरकारने जानेवारी ते मार्च २०२६ या तिमाहीसाठी सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर जाहीर केले आहेत.
सध्याचा व्याजदर: ८.२% (वार्षिक)
विशेषता: हा व्याजदर बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिट (FD) पेक्षा जास्त आहे आणि यात मिळणारे व्याज पूर्णपणे करमुक्त (Tax-Free) असते.
गुंतवणुकीचे गणित: किती जमा केल्यावर किती मिळतील? (SSY Calculator)
खालील टेबलमध्ये तुम्ही पाहू शकता की दरमहा किती गुंतवणूक केल्यावर २१ वर्षांनंतर किती रक्कम मिळू शकते,
| दरमहा गुंतवणूक | वार्षिक गुंतवणूक | १५ वर्षात एकूण जमा | २१ वर्षांनंतर मिळणारी रक्कम |
| १,००० रुपये | १२,००० रुपये | १,८०,००० रुपये | ५,५४,००० रुपये |
| २,५०० रुपये | ३०,००० रुपये | ४,५०,००० रुपये | १३,८७,००० रुपये |
| ५,००० रुपये | | ६०,००० रुपये | ९,००,००० रुपये | २७,७५,००० रुपये |
| १२,५०० रुपये | १,५०,००० रुपये | २२,५०,००० रुपये | ७१,८२,००० रुपये |
(टीप: वरील आकडेवारी ८.२% वार्षिक व्याजदरानुसार अंदाजित आहे.)
“महिलांनो, सरकार देतंय ₹१५,००० ची फ्री शिलाई मशीन! आजच असा करा मोबाईलवरून अर्ज.”
गुंतवणूक करताना गोंधळ होतोय? मग हे सोपे गणित पाहा!
SSY New Interest Rate 2026: अनेक पालकांच्या मनात प्रश्न असतो की, या योजनेत दरवर्षी ठराविक रक्कम भरणे बंधनकारक आहे का? तर याचे उत्तर ‘नाही’ असे आहे.
तुम्ही तुमच्या सोयीनुसार एखाद्या वर्षी १०,००० भरू शकता तर एखाद्या वर्षी १ लाख रुपये टाकू शकता. वर्षभरात किमान २५० रुपये भरूनही खाते चालू ठेवता येते.
या योजनेत सध्या ८.२% वार्षिक व्याज (SSY New Interest Rate 2026) मिळते. तुम्ही भरलेल्या व्याजावरही पुन्हा व्याज मिळते, ज्यामुळे छोटी बचत मोठी रक्कम बनते.
PAN–आधार लिंक झाले आहे का नाही, कसं तपासाल? लिंक नसेल तर बँक व व्यवहारांवर काय परिणाम होतो?”
योजनेचे नियम आणि पात्रता
(Eligibility & Rules)
१. वय: मुलीचे वय १० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी तिचे खाते उघडता येते.
२. गुंतवणूक: वर्षाला किमान २५० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करता येतात.
३. कालावधी: १५ वर्षे पैसे जमा करावे लागतात आणि मुलगी २१ वर्षांची झाल्यावर खाते मॅच्युअर होते.
४. शिक्षण: मुलगी १८ वर्षांची झाल्यावर उच्च शिक्षणासाठी ५०% रक्कम काढता येते.
लागणारी महत्त्वाची कागदपत्रे
(Required Documents)
मुलीचा जन्म दाखला (Birth Certificate).
पालकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड.
पालकांचा पत्त्याचा पुरावा.
मुलीचा आणि पालकांचा फोटो.
SSY New Interest Rate 2026:सुकन्या समृद्धी योजना ही केवळ बचत नसून तुमच्या मुलीच्या स्वप्नांना दिलेली गरुडझेप आहे. आजच आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन हे खाते उघडा. इतरांना देखील शेअर करू शकता.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट: https://www.indiapost.gov.in
![]()








