Us Vikas yojana in marathi 2025: जाणून घेऊया संपूर्ण माहिती
Us Vikas yojana in marathi 2025:महाराष्ट्र राज्य सरकारने ऊस उत्पादनाचा खर्च कमी करून उत्पादकता वाढवण्यासाठी एक नवीन पायाभूत योजना सुरू केली आहे. राज्यात सध्या सरासरी ११.६७ लाख हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड होत असून, उत्पादकता ९० मेट्रिक टन प्रति हेक्टर आहे. या पार्श्वभूमीवर, २०२४-२५ च्या आर्थिक वर्षात “ऊस विकास योजना” राबवण्यात येत आहे, ज्यातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार बियाणे आणि प्रशिक्षण देऊन उत्पादनाची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल.
चला तर मग आज गेले का मध्ये या ऊस विकास योजना 2025 याबद्दल पडणारा सर्व प्रश्नांची उत्तरे जसे की या योजनेची लाभार्थी कोण हे या योजनेचा अर्ज कसा करायचा लाभार्थी कोण या लेखात पाहूया यासाठी तुम्ही हा लेख संपूर्ण वाचा.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
Feature
१. एक डोळा पट्टा पद्धतीचा वापर
आंतरपीक प्रात्यक्षिके राबविणे.
ऊसाच्या पिकासह इतर पिकांची लागवड करून जमिनीची सुपीकता वाढविणे.
२. ऊती संवर्धित रोपांची निर्मिती
निरोगी व दर्जेदार ऊसाच्या रोपांमुळे उत्पादन वाढविणे.
स्थानिक पातळीवर बेणे माळे तयार करणे सुलभ करणे.
३. पीक संरक्षण आणि बायो-एजंट्सचे वितरण
रासायनिक औषधांऐवजी जैविक पद्धतींचा वापर करून पर्यावरणास अनुकूल शेती.
४. प्रशिक्षण आणि मनुष्यबळ विकास
शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतींचे प्रशिक्षण देणे.
सौर पंप बंद पडला? घाबरू नका! महावितरण ॲपवर 3 स्टेपमध्ये तक्रार करा
योजनेची उद्दिष्टे काय?
Purpose
Us Vikas yojana in marathi 2025: ऊसाचा उत्पादन खर्च कमी करणे.
उत्पादकता वाढविणे आणि दर्जेदार बियाण्याचा वापर वाढवणे.
ऊती संवर्धित बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून देणे.
आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणे.
हे आहेत समाविष्ट जिल्हे
योजना खालील ८ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येते:
- नंदूरबार
- अहिल्यानगर
- सोलापूर
- कोल्हापूर
- जालना
- बीड
- लातूर
- धाराशिव
अनुदानाचा तपशील खालील प्रमाणे
योजना घटक | अनुदान रक्कम |
एक डोळा पट्टा पद्धत व आंतरपीक प्रात्यक्षिके | ₹९,०००/हेक्टर |
मुलभूत बियाणे उत्पादनासाठी अर्थसहाय्य (कृषी विद्यापीठ) | ₹४०,०००/हेक्टर |
ऊती संवर्धित रोपे | ₹३.५०/रोप |
पीक संरक्षण औषधे व बायो-एजंट्स | ₹५००/हेक्टर |
राज्यस्तरीय प्रशिक्षण | ₹४०,०००/प्रशिक्षण |
पाचट व खोडवा व्यवस्थापन प्रात्यक्षिके | ₹६,०००/हेक्टर |
सुपरकेन नर्सरी | ₹१०,०००/हेक्टर |

लाभार्थी
Benefits
- नोंदणीकृत शेतकरी उत्पादक गट.
- शेतकरी उत्पादक कंपन्या.
- कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्था.

अर्ज करण्याची पद्धत
Apply
- Us Vikas yojana in marathi 2025: महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर (https://mahadbt.maharashtra.gov.in) ऑनलाइन अर्ज सादर करावा.
- “प्रथम येणाऱ्यास प्राधान्य” (FCFS) या तत्त्वावर लाभार्थी निवड केली जाईल.