VB–G RAM G Bill Marathi:”आज संसदेत एक महत्त्वाचा कायदा मंजूर– VB–G RAM G वा विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन”

VB–G RAM G Bill Marathi: जाणून घ्या,VB–G RAM G कायदा म्हणजे नेमकं काय आहे?

VB–G RAM G Bill Marathi: नमस्कार, गेल्या दोन-तीन दिवसांपासून संसदेत व्ही बी रामजी बिलाची चर्चा गाजत आहे. हे बिल म्हणजे “विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन” (VB–G RAM G). जे ग्रामीण कुटुंबांना वर्षाला १२५ दिवस रोजगाराची हमी देणारा नवा कायदा आहे. हा कायदा मनरेगाच्या जागी येत आहे आणि फक्त रोजगार देण्यापुरता मर्यादित नसून, ग्रामीण भागात टिकाऊ पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न आहे.

VB–G RAM G Bill Marathi:वर्तमानपत्रानुसार,VB–G RAM G बिलाची संसदेत जोरदार चर्चा झाली आणि अखेर ते मंजूर करण्यात आले. हा कायदा ग्रामीण भागातील कुटुंबांना वर्षाला १२५ दिवस रोजगाराची हमी देतो. यामुळे फक्त रोजगार देण्यापुरता मर्यादित नसून, ग्रामीण भागात पाणीसुरक्षा, रस्ते, साठवणूक आणि बाजारपेठा यांसारख्या सुविधा उभारण्याचा उद्देश आहे.

यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि स्थलांतराचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. रोजगाराच्या बरोबर दीर्घकालीन विकासाला चालना मिळेल, यामुळे हा कायदा ग्रामीण भागाच्या विकासासाठी खूप महत्त्वाचा आहे.

“फक्त १० टक्के भरून सौर कृषी पंप मिळवा! ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’मधून शेतकऱ्यांना मोठा फायदा”

मुख्य बदल आणि वैशिष्ट्ये

main fractures

  • ग्रामीण कुटुंबांना वर्षाला 125 दिवस रोजगाराची हमी मिळणार आहे.
  • मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा नवा कायदा आहे.
  • ग्रामीण भागात टिकाऊ पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि रोजगार वाढवण्यासाठी आहे.
  • पाणी सुरक्षा, रस्ते, साठवणूक आणि बाजारपेठा यांसारख्या महत्त्वाच्या सुविधा उभारण्यासाठी भर देण्यात आला आहे.
  • केंद्र-राज्य खर्चाचे नवीन प्रमाण (60:40, काही राज्यांसाठी 90:10) आहे.
  • कामे शेतीच्या पीक काळात थांबवण्याची तरतूद (60 दिवसांपर्यंत) आहे.
  • बायोमेट्रिक अटेंडन्स, एआय-आधारित फ्रॉड डिटेक्शन, जीपीएस ट्रॅकिंग यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
  • आठवड्याला मजुरी देणे बंधनकारक आहे.
  • ग्रामपंचायतींना केंद्रस्थानी ठेवून स्थानिक नियोजन केले जाणार आहे.
  • विशेष गटांसाठी (एकल महिला, दिव्यांग, वृद्ध, जात्रेबाज इ.) विशेष कार्ड दिले जाणार आहेत.

”आता तलाठी ऑफिसला जाण्याची गरज नाही! मोबाईलवरच 7/12 Utara कसा डाउनलोड कराल? संपूर्ण माहिती”

फायदे आणि अपेक्षा

benefits

  • ग्रामीण भागात रोजगार वाढेल आणि उत्पन्नाची सुरक्षितता वाढेल.
  • पाणीसुरक्षा, रस्ते, साठवणूक आणि बाजारपेठा यांसारख्या सुविधा उभारल्याने दीर्घकाळात फायदा होण्याची अपेक्षा आहे.
  • ग्रामपंचायतींना केंद्रस्थानी ठेवून स्थानिक नियोजन केल्याने योजनेची कार्यक्षमता वाढेल.
  • डिजिटल मजुरी आणि माहितीआधारित नियोजनामुळे योजनेची कार्यक्षमता वाढेल.

VB–G RAM G कायदा हा MGNREGA चा केवळ पर्याय नाही, तर ग्रामीण रोजगार आणि विकासाच्या संकल्पनेला नवे स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे. रोजगाराची हमी कायम ठेवत, अधिक जबाबदार, पारदर्शक आणि दीर्घकालीन विकासाला चालना देणारी यंत्रणा उभारण्याचा हा प्रयत्न आहे. या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते, यावरच त्याचे यश किंवा अपयश अवलंबून असेल. ही माहिती तुम्ही इतरांना देखील शेअर करू शकता.

कमी हप्ता, सर्वाधिक बोनस आणि सरकारी सुरक्षेची हमी! पोस्टाची जीवन विमा (PLI) योजना

खात्यात झिरो बॅलन्स? तरीही जनधन खात्यातून १०,००० रुपये काढू शकता; जाणून घ्या कशी मिळते ओव्हरड्राफ्ट सुविधा

अधिक माहितीसाठी

Loading