Vihir Anudan Yojana Update in Marathi: जाणून घेऊया किती मिळतोय लाभ आणि कसा करायचा अर्ज
Vihir Anudan Yojana Update in Marathi:राज्यातील जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणण्यासाठी शासनाने मनरेगा योजनेतून विहीर खुदाई साठी प्रोत्साहन दिले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहीर या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधांचा लाभ देणे आणि त्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ करणे आहे.
Vihir Anudan Yojana Update in Marathi: राज्यातील शेतकऱ्यांसाठी विहीर अनुदान योजना ही एक महत्त्वपूर्ण संधी असून ज्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन अर्ज करून विविध सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ होणार असून त्यांचे आर्थिक स्थिती देखील सुधारणा होईल. शासनाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना एक नवीन उमेद तसेच आत्मविश्वास प्रधान होणार असून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवता येईल.
योजना कशी कार्य करते?
How does it work?
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) राज्यात विविध ठिकाणी सिंचन विहिरी खोदल्या जात आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा लागतो. अर्जदाराची निवड झाल्यानंतर, शासनाच्या अटींनुसार अनुदानाचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात.
“90% अनुदानासह राज्य सरकारची ‘तार कुंपण योजना’
हे पहा>>>>>> “आता मोबाईल वरून पीएम इंटर्नशिप योजनेचा करा अर्ज”
अनुदानात किती वाढ मिळते?
Increase in subsidy
Vihir Anudan Yojana Update in Marathi: या पूर्वी योजनेत शेतकऱ्यांना ४ लाखाचे अनुदान मिळत होते, परंतु आता शासनाने विहिरींच्या अनुदानात एक लाखाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवीन लाभार्थ्यांना पाच लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक मदत मिळणार आहे, ज्यामुळे ते आपल्या शेतीच्या कामात अधिक गुंतवणूक करू शकतील.
लाभार्थ्यांसाठी निकष
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष खालील प्रमाणे
अर्जदाराकडे किमान एक एकर शेतजमीन सलग असावी.
पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून ५०० मीटरपेक्षा जास्त अंतरावर सिंचन विहीर खोदता येईल.
दोन विहिरींमध्ये १५० मीटर अंतराची अट मागासवर्गीय, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी लागू नाही.
लाभधारकाच्या सातबाऱ्यावर याआधीच विहिरीची नोंद असू नये.
अर्जदार हा जॉब कार्डधारक असला पाहिजे.

कोणाला मिळतो लाभ?
Who benefits?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील गटातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते:
अनुसूचित जाती/जमाती भटक्या जमाती व विमुक्त जाती.
दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी.
महिला-कर्ता असलेली कुटुंबे.
विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे.
जमीन सुधारणांचे लाभार्थी.
इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी.
सिमांत शेतकरी (२.५ एकर पर्यंत शेतजमीन).
अल्प भूधारक शेतकरी (५ एकरपर्यंत शेतजमीन).
अर्ज कसा करावा?
How to Apply?
पात्र शेतकऱ्यांनी आपल्या गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात या योजनेसाठी लेखी अर्ज द्यावा. अर्ज सादर केल्यानंतर, ग्रामपंचायतीकडून आवश्यक तपासण्या केल्यानंतर लाभार्थ्यांची निवड केली जाईल.
हे पहा>>>>>भारत सरकारचे हे सात कार्ड आहेत का तुमच्याकडे?
अनुदान मिळवा! औषधी वनस्पतींच्या विकासासाठी केंद्र सरकारची ही योजना