Voter ID Info In Marathi: जाणून घेऊया, घरबसल्या स्टेप बाय स्टेप गाईड!
Voter ID Info In Marathi: तुम्हाला वोटर आयडी तयार करायचे आहे का? सरकारी कार्यालयात जाऊन रांगेत उभे राहुण कंटाळवाणे होते. चला,तर मग घरबसल्या काढा आता वोटर आयडी स्टेप बाय स्टेप गायडन्स सह.
Voter ID Info In Marathi:आज या लेखामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमध्ये काही सोप्या स्टेप्स फॉलो करून वोटर आयडी कार्ड ऑनलाईन काढू शकता.
वोटर आयडी(voter id) कार्ड काढण्याची प्रक्रिया
Voter ID card issuance process
सर्वप्रथम वोटर हेल्पलाइन ॲप डाउनलोड करा:
सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअरमध्ये जा.
तिथून वोटर हेल्पलाइन (Voter Helpline) नावाचं ॲप इन्स्टॉल करा.
ॲप ओपन करा आणि नवीन मतदार नोंदणीवर टॅप करा:
ॲप इंस्टॉल झाल्यावर मतदार नोंदणीवर टॅप करा.
त्यानंतर तुम्हाला इंटरफेस दिसेल, त्यातील नवीन मतदार नोंदणी यावर टॅप करा.
फॉर्म 6 भरा:
त्यानंतर फॉर्म 6 वर क्लिक करा. तिथे तुम्हाला लेट्स स्टार्ट (Let’s Start) यावर क्लिक करावं लागेल.
त्यानंतर तुम्हाला नवा इंटरफेस दिसेल, त्यावर तुम्हाला ‘होय मी प्रथमच अर्ज करीत आहे’ हा पर्याय निवडून नेक्स्ट यावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुमचं संपूर्ण तपशील अचूकपणे भरा.
दिलेल्या पर्यायात तुमचं राज्य, तुमचा विधानसभा मतदारसंघ निवडा.
तुमची जन्मतारीख प्रविष्ट करा. जन्मतारखेच्या नोंदणीसाठी डॉक्युमेंट या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा आधार कार्डचा फोटो तिथे अपलोड करावा लागेल. (फोटोचा आकार 200 केबी एवढा असावा)
नेक्स्ट (Next)यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करण्याचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करून फोटो अपलोड करा.
तुमचं जेंडर (Gender) निवडा. तुमचं नाव प्रविष्ट करा. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा.
आता तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर नवीन पर्याय दिसतील, त्यावर तुम्हाला तुमचे नाते यावर क्लिक करावं लागेल. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचे वडील हा पर्याय निवडू शकता.
त्यानंतर त्याखाली वडिलांचे नाव लिहा. तुमचा पत्ता भरा.
पुढे क्लिक करा. (Click)तुमचं पोस्ट ऑफिस कोणतं आहे ते लिहा. तुमचा पिन कोड टाका.
ॲड्रेस प्रूफ (Address Proof) निवडा.
अशा रीतीने तुमचं मतदार ओळखपत्र तयार होईल. तर अशा सोप्या पद्धती वापरून तुम्ही तुमचा वेळ आणि श्रम देखील वाचू शकता.
महत्वपूर्ण नोंद
Important Note
वोटर रजिस्ट्रेशन (voter id) एक महत्त्वाची गोष्ट आहे. मतदार ओळखपत्र काढण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावं लागत नाही.
Voter ID Info In Marathi: Voter Helpline app
आजच गुंतवणूक करा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करा !
श्री गजानन लीला गाथा १ अध्याय (लहान पोथी)
शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?
असं करा इम्प्रेस तुमच्या व्हॅलेंटाईन पार्टनरला!
थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!
“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!
Voter ID Info In Marathi: accused-absenteeism-and-the-dispensing-of-313-statements-a-case-study-of-the-bombay-high-courts-approach-in-navneet-singh-gogia-vs-state-of-maharashtra/embed/