Bhagva Zenda ashadi vari 2025: वारकऱ्यांच्या हातात दिसतो  तो भगवा ध्वज, या रंगाचे गूढ महत्त्व!

Bhagva Zenda ashadi vari 2025:  जाणून घेऊया या  केशरी ध्वजाचा इतिहास” आणि वारकऱ्यांसाठी महत्व

Bhagva Zenda ashadi vari 2025: नमस्कार सध्या आषाढी वारीच्या निमित्ताने अनेक वारकरी, दिंड्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरच्या दिशेने जात आहे.  या वारीमध्ये अनेक गावांना मागे टाकत हे वारकरी विठुरायाच्या दर्शनाला आषाढीला जातात. या वारकऱ्यांच्या हातात मुख्यत्वे दिसतो तो भगवा ध्वज (Bhagva Zenda ashadi vari) या ध्वजाला विशेष असे स्थान आहे दिंड्यांमध्ये, पण हा केशरी रंग का? या रंगामागे कोणते तत्त्वज्ञान दडलेले आहे? याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊ.

चला तर मग आज या लेखांमध्ये या वारकऱ्यांच्या हातात दिसणाऱ्या भगव्या ध्वजाबद्दल थोडक्यात महत्वपूर्ण अशी माहिती घेऊया.

भगवा  केशरी ध्वज म्हणजे त्याग आणि तपाचे प्रतीक आहे.

Bhagva Zenda ashadi vari 2025: हिंदू धर्मात केशरी रंगाला विशेष महत्त्व आहे. हा रंग त्याग, बलिदान, ज्ञान, पावित्र्य आणि सेवेचे प्रतीक मानला जातो. सनातन परंपरेतील साधू-संत जेव्हा मोक्षमार्गाचा संकल्प करतात, तेव्हा ते केशरी वस्त्रे परिधान करतात. वारकरी संप्रदायातही भगवा ध्वजाला विशेष स्थान आहे.

केशरी वस्त्र हे संयम, संकल्प आणि आत्मनियंत्रणाचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे यज्ञाग्नीतून केशरी ज्वाला निघतात, त्याचप्रमाणे साधू-संतांच्या तपश्चर्येच्या तेजाने त्यांची काया केशरी रंगाची दिसते.

Bhagva Zenda ashadi vari 2025: वारकऱ्यांच्या हातात दिसतो  तो भगवा ध्वज, या रंगाचे गूढ महत्त्व!

देवतांच्या स्वरूपातील दिसते केशरी छटा

केशरी रंग हा अनेक देवतांच्या स्वरूपात दिसून येतो, जसे की

Bhagva Zenda ashadi vari 2025: दुर्गा माता शक्तीचे प्रतीक आहे केशरी रंग, हनुमंत भक्ती आणि सेवेचे मूर्तिमंत रूप  तसेच विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे तेज देखील आहे केशरी रंग.या देवतांच्या स्वरूपातील केशरी रंगामुळे त्यांची ऊर्जा आणि आशीर्वाद प्राप्त होतात.

पंढरीची वारी! संतांच्या पायवाटेवरून होणारा 300 किमीचा अलौकिक सहप्रवास!”

ऐतिहासिक विजयाचा साक्षीदार देखील आहे भगवा ध्वज

भगवा ध्वज हा केवळ आध्यात्मिकच नाही तर ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. रामायण, महाभारतापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत भगवा ध्वज विजयाचा निदर्शक म्हणून वापरला गेला. स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या राष्ट्रीय ध्वजातही केशरी रंगाला स्थान मिळाले.

Bhagva Zenda ashadi vari 2025: वारकऱ्यांच्या हातात दिसतो  तो भगवा ध्वज, या रंगाचे गूढ महत्त्व!

अंधारावर मात करणारा रंग म्हणजे केशरी रंग

केशरी रंगाची एक विशेषता आहे की तो अंधारातही चमकतो. म्हणूनच द्रुतगती मार्गावर केशरी रंगाचे पट्टे रेखाटलेले असतात. याचाच अर्थ असा की केशरी रंग अंधारावर, अधर्मावर आणि अंधश्रद्धेवर मात करणारा आहे.

सूर्योदयाचा रंग देखील भगवा रंग

केशरी हा सूर्योदयाचाही रंग आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील नात्याप्रमाणे धर्माचा उदय झाल्याशिवाय समाजाचे चलनवलन होत नाही. म्हणून हिंदू धर्माचा ध्वज केशरी रंगाचा आहे.

भगवा ध्वज हा केवळ एक रंग नसून तो संपूर्ण हिंदू संस्कृतीच्या तत्त्वज्ञानाचा आरसा आहे. आषाढी वारीच्या या पावन प्रसंगी भगव्या ध्वजाचे त्याग, सेवा आणि भक्तीच्या मार्गावर चालण्याचा  सर्वांना सुचवतो आपल्याला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास आपण इतरांना देखील शेअर करू शकता.

Loading