Friendship Day 2025 in Marathi: मैत्री दिनाचा रंजक इतिहास कसा सुरू झाला ‘हा’ उत्सव?

Friendship Day 2025 in Marathi: रक्ताच्या नात्या पलीकडचं हे नातं मैत्रीचं

Friendship Day 2025 in Marathi:जगात अनेक नाती जन्माने मिळतात,पण मैत्रीचे नाते हे असे नाते आहे जे आपण स्वतः निवडतो. हे नाते विश्वास, प्रेम आणि निस्वार्थ समर्थनाचे प्रतीक आहे. तसे पाहता कोणत्या दिवसापूर्वी  मैत्री दिवस हा मर्यादित नाही.प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा होणारा ‘फ्रेंडशिप डे’ Friendship Day (मैत्री दिवस) याच अमूल्य नात्याचा गौरव करतो.२०२५ मध्ये हा दिवस ३ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. हा दिवस आपल्याला आपल्या मित्रांचे

आभार मानण्याची, जुन्या आठवणींना उजाळा देण्याची आणि नवीन आठवणी तयार करण्याची एक अनोखी संधी देतो. हा लेख फ्रेंडशिप डेचा इतिहास, त्याचे महत्त्व आणि हा दिवस कसा साजरा करावा याबद्दल अधिक माहिती देतो.

मैत्री दिनाचा इतिहास

History of friendship day

Friendship Dayची संकल्पना १९५० च्या दशकात अमेरिकेत हॉलमार्क कार्ड्सचे संस्थापक जॉइस हॉल यांनी मांडली. सुरुवातीला हा दिवस व्यावसायिक हेतूने सुरू करण्यात आला होता, जेणेकरून लोक आपल्या मित्रांना ग्रीटिंग कार्ड्स पाठवून आपल्या भावना व्यक्त करू शकतील. हळूहळू, ही संकल्पना जगभरात पसरली.

१९५८ मध्ये, पराग्वेमध्ये (Paraguay) वर्ल्ड फ्रेंडशिप क्रुसेड (World Friendship Crusade) या संस्थेद्वारे पहिल्यांदा फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा औपचारिक प्रस्ताव मांडण्यात आला. यानंतर ही परंपरा अनेक देशांमध्ये पसरली आणि जगभरात मैत्रीचा उत्सव म्हणून साजरा होऊ लागली.

Friendship Day 2025 in Marathi: आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस (International Day of Friendship) म्हणून ३० जुलै हा दिवस संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) २०११ मध्ये अधिकृतपणे जाहीर केला, ज्याचा उद्देश जागतिक शांतता आणि एकतेला प्रोत्साहन देणे हा होता. मात्र, भारत आणि अनेक देशांमध्ये ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हाच दिवस आजही मैत्री दिन म्हणून साजरा करण्याची पारंपरिक पद्धत आहे.

मैत्री दिनाचे महत्त्व

 importance

Friendship Day आपल्याला आपल्या मित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांना जपण्याची संधी देतो. हा दिवस केवळ वैयक्तिक संबंध मजबूत करत नाही, तर सामाजिक एकता (Social Unity), समावेशकता (Inclusivity) आणि सांस्कृतिक विविधतेलाही (Cultural Diversity) प्रोत्साहन देतो. मानसशास्त्रीय दृष्ट्या, मैत्रीमुळे ताण, एकटेपणा आणि चिंता कमी होते. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की मित्र हे असे कुटुंब आहेत, ज्यांना आपण स्वतः निवडतो.

एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात एका चांगल्या मित्राची गरज का असते, याचे महत्त्व मैत्री दिन अधोरेखित करतो. जीवन प्रवासात अनेक चढ-उतार येतात, अशा कठीण परिस्थितीत एक चांगला मित्र तुमच्या भावना ऐकून घेतो, तुम्हाला धीर देतो आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो.मैत्रीच्या नात्यात न वयाची अट असते ना काही कर्तव्य असतात ती फक्त मैत्री असते. मैत्री याबद्दल अजून काय सांगता येईल आपल्या साहित्यामध्ये मैत्रीबद्दल अनेक कथा कादंबऱ्या लिहिल्या आहेत. पण प्रत्येकाला मित्र किंवा मैत्रीण असावी.

 असं करा फ्रेंडशिप डे साजरा

Friendship Day 2025 in Marathi: केवळ आपल्या सोबत असलेल्या मित्र-मैत्रिणी Friendship Day सेलिब्रेट करता, तसा, आपल्या प्रिय व्यक्ती म्हणजेच जिला आपण आपल्या मनातील सर्व गोष्टी सांगतो अशी आई, किंवा बाबा तिच्यासोबत देखील तुम्ही फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करा. आपल्या जुन्या मित्र-मैत्रिणींना मुद्दामून फोन करून बोला, एखाद्या वेळेस एखाद्या मित्र-मैत्रिणी सोबत वाद झाला असेल आणि अबोला असेल तर हा दिवस उत्तम आहे परत एकदा सुरुवात करण्यासाठी तुम्हालाही माहिती योग्य वाटत असल्यास इतरांना देखील शेअर करा. 

Friendship Day 2025 in Marathi:बाळासाहेबांचा नातू बॉलिवूडमध्ये! अनुराग कश्यपच्या ‘नीशांची’मध्ये धमाकेदार एंट्री!”

Loading