Table of Contents
ToggleMatsyodari Devi Heritage Of Ambad 2024: जालना जिल्ह्याची आराध्य दैवत
Matsyodari Devi Heritage Of Ambad 2024: महाराष्ट्रात आदिशक्ती मायेचे साडेतीन पीठ प्रसिद्ध असून, महाराष्ट्रात ठिक-ठिकाणी अनेक देवींचे मंदिर प्रसिद्ध आहेत.अनेक गावांमध्ये आपल्याला ग्रामदेवता तसेच विविध देवांचे जसे की माहूरच्या रेणुकायचे किंवा तुळजाभवानीचे ठाणे हे पाहायला मिळते.
Matsyodari Devi Heritage Of Ambad 2024: मराठवाड्यात जालना जिल्ह्यात अंबड या गावी एक सुप्रसिद्ध असे देवीचे मंदिर आहे. मत्स्योदरी नावाने ही देवी प्राख्यात आहे.
मत्स्योदरी ही देवी अंबड हे एक तालुक्याचे ठिकाण असून मत्स्योदरी देवी भक्ताला नवसाला पावणारी देवी म्हणून देखील प्रसिद्ध आहे. गावात प्रवेश करतात आपल्याला मत्स्योदरी देवीचे मोठे असे प्रवेश द्वार दिसते. थोडेसे पुढे गेले असता आपल्याला देवीचे भव्य दिव्य असे सुंदर मंदिर पहावयास लागते. देवीची मूर्ती ही एक नसून मंदिरात तीन देवीचे भव्य असेन तांदळे आहेत. जे आपलं लक्ष वेधून घेतात.महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या त्रय आदिशक्र्तीचे सिंधुरांकित भव्य तांदळे आहेत.
Matsyodari Devi Heritage Of Ambad 2024: नवरात्र उत्सव म्हटला की अनेक देव्या देवींच्या यात्रा या ठरलेल्या असतात तसेच अनेक देवीभक्त मुख्यत्वे स्त्रिया मंदिरात घटी बसतात म्हणजेच त्या नऊ दिवस मंदिरातच राहतात. मराठवाड्यात अनेक ठिकाणी देवीच्या मंदिराच्या बाहेर आणि स्त्रिया जोगवा मांगण्यासाठी बसतात. हा जोगवा आपण परडी रुपी असून त्यात तेल, मिरच्या, एखादी डाळ, आणि पीठ या स्वरूपात असतो.
Matsyodari Devi Heritage Of Ambad 2024: मत्स्योदरी देवी ही त्रयस्वरूपी देवी म्हणून ओळखली जाते.आग्नेय दिशेकडे तोंड करुन असलेल्या तीन प्रकोष्ठांमध्ये महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या त्रय आदिशक्ति सिंधुरांकित भव्य तांदळे आपले लक्ष वेधून घेते तीच मत्स्योदरी देवी.
Matsyodari Devi Heritage Of Ambad 2024:मत्स्योदरी नामकरण
Matsyodari Devi Heritage Of Ambad 2024:याचे कारण ज्या डोंगरावर (मत्स्याद्री, मत्स्य पर्वत) देवीचे मंदिर आहे त्या डोंगराचा आकार मत्स्याकृती (माशासारखा) आहे. डोंगररुपी मत्स्याच्या उदराचा भाग ज्या ठिकाणी येतो त्या भागात असलेल्या नैसर्गिक गुहेत देवीच्या मंदिराचा गाभारा असल्यामुळे साहजिकच मत्स्याचे उदरी जी आहे ती मत्स्योदरी असे नामाभिधान या देवीस प्राप्त झालेले आहे. तसे मत्स्योदरी नाव हे फार पुरातन आहे.
अनेक वर्षाच्या कालावधीनंतर मूळ मूर्तीपासून सुटून खाली पडतात तेव्हा मूळ मूर्तीचे दर्शन भाविकांना घडते. यापूर्वी एका देवीचा शेंदराचा तांदळा १९७९ साली दसऱ्याच्या महोत्सव नंतर खाली पडला होता. त्यावेळी भाविकांना मूळ रेखीव पाषाण मूर्तीचे सगुण दर्शन झाले होते. या मुळ मूर्ती डोंगरातील प्रस्तरावरच सबकपणे कोरलेल्या आहेत.
कलियुगात तिला जगदंबा हे नामाभिधान प्राप्त झालेले आहे, असा उल्लेख मत्स्योद माहात्म्याच्या पहिल्या अध्यायात आलेला आहे.
कृते मच्छोदरी नाम त्रेतायां भद्रकालिका ।
द्वापारे तु महालक्ष्मी कलौसा जगदंबिका ।। १/१७ या दृष्टीने विचार केल्यास कृतयुगापूर्वी पासून मत्स्याद्री पर्वतावर वास करीत असलेली ही मत्स्योदरी देवी मराठवाड्याचे सार्थ भूषण आहे.
मत्स्याद्री पर्वताचे महात्म्य मत्स्याद्री पर्वताच्या ठिकाणी केवळ जगदंबेचा वास असलेला पर्वत एवढेच त्या वैशिष्ट्य नसून याची सविस्तर महती श्रीस्कंद पुराणांतर्गत असलेल्या सह्याद्री खंडातील मत्स्योदरी महात्म्य या दहा अध्यायी संस्कृत ग्रंथात वर्णन केलेली आहे.
मच्छाद्रेर्ममानन्तं सर्वाघौघ विनाशम् ।
मच्छाद्रिस्तु गिरिःपुण्यः पुण्यारण्येतु दंडके ।। ३/११
यत्र साक्षात् क्षीकेशो वसतेह्यंबिकामयः ।
आद्या नारायणी शक्ती विष्णोर्माया परात्परा ।। ३/१२
नाना तीर्थ समायुक्ते मच्छोदरी गिरौशुभे ।
भवान्याधिष्ठिते पुण्ये सर्वदेवमये नृप ।। ३/१४
चंद्राच्या वास्तव्याने पावन झालेल्या दंडकारण्यातील मत्स्याद्री पर्वत हा या पर्वताचे महिमान एवढे आहे की, त्याच्या साक्षात् दर्शनानेच सर्व पापांच बा पर्वतावर विष्णू व जगदंबिका जी आद्या नारायणी शक्ती असून विष्णूची माया स्वरुपी आहे त्या दोघांचा अखंड वास आहे. अनेक तीर्थामुळे हा मत्स्याद्री पर्वत पावन झालेला असून जगदंबा व इतर सर्व देवतांच्या अधिष्ठानामुळे पुण्यमय झालेला आहे. या पर्वताच्या पुण्य स्वरुपाप्रमाणे या पर्वतास प्रदक्षिणा घातल्यास कोणती फळे मिळतात त्याचे वर्णन मत्स्योदरी माहात्म्याच्या दहाव्या अध्यायात आलेला आहे.
यःपर्वतं प्रक्रमणं करोति सशक्र वन्द्य सुतरांस वन्द्यः । पदे पदे पापसमूह दाहं करोति नैवास्ति विचारवान् ।। ९०/६१
जन्म प्रभृति यः कश्चिदेकामेव प्रदक्षिणां ।
यदा कदाचित् कुरुते सस्वर्गे मोदते चिरम् ।। १०/६२
जो या पर्वतास प्रदक्षिणा घालतो त्याच्या पातकांचा नाश प्रदक्षिणा करताना पावलो पावली होत असतो. जन्माला आल्यानंतर एखाद्याने मत्स्याद्री पर्वतास एक जरी प्रदक्षिणा घातली तर तो आनंदाने स्वर्ग सुखाचा कायमचा अधिकारी होतो.
Matsyodari Devi Heritage Of Ambad 2024: मत्स्योदरी देवीचे प्राचीनत्व
Matsyodari Devi Heritage Of Ambad 2024: देवी मत्स्योदरी चे स्थान हे अतिशय प्राचीन असून या स्थानाच्या निर्मिती संबंधी कोणतीही अशी निश्चित माहिती उपलब्ध नसून, तरी देवीच्या महात्मासंबंधी कंदपुराणातील सह्याद्री खंडात मत्स्योदरी महात्मा हा ग्रंथ उपलब्ध आहे. स्कंदपुराणाची रचना ही २००० वर्षापेक्षा जुनी असून त्यात मस्करी मत्स्योदरी देवीच्या स्थानात हजार वर्षांची परंपरा असल्याचे कळते.मत्स्योदरी माहात्म्य या ग्रंथात देवीभक्त असलेले मार्कंडेय ऋषी आणि वैष्णवभक्त राजा अंबरीष यांचा संवाद ठिकठिकाणी आपणास पाहायला मिळते.कलियुगात तिला जगदंबा हे नामाभिधान प्राप्त झालेले आहे असा उल्लेख मत्स्योद माहात्म्याच्या पहिल्या अध्यायात आलेला पाहायला मिळते.
Matsyodari Devi Heritage of Ambad 2024:मत्स्योदरी माहात्म्य या ग्रंथात देव नाव कृतयुगात मत्स्योदरी असेच होते हे स्पष्ट केले असून त्रेतायुगात तिला भद्रकाली संबोधले जाऊ लागले तर द्वापारयुगात ती महालक्ष्मी या नावाने प्रसिध्द झाली. कलियुगात तिला जगदंबा हे नामाभिधान प्राप्त झालेले आहे असा उल्लेख मत्स्योद माहात्म्याच्या पहिल्या अध्यायात आलेला आहे.
Matsyodari Devi Heritage Of Ambad 2024:मंदिराची रचना
Matsyodari Devi Heritage Of Ambad 2024: मंदिराचे एकंदर बांधकाम पाहता हे मंदिर निश्चितपणे पाच-सहाशे वर्षापूर्वी बांधले गेलेले आहे हे निश्चितच.
मंदिराच्या सुरुवातीस आपल्याला मुख्य प्रवेशद्वारातून मध्ये गेल्यानंतर मंदिर हे उंच गडा पर्वतावर असून मंदिरात ला एकूण ६५ पायऱ्या आहेत. पाय धुऊन पायऱ्या चढून वर गेल्यावर किंचितसे नैऋत्येकडे असलेल्या पश्चिमाभिमुख भव्य द्वारासमोरील दगडी पटांगणावर दीपमाळीजवळ उभे राहून भक्तागण आजूबाजूचा परिसर आपणास अनुभवता येतो.
मंदिराच्या डाव्या बाजूस असलेला मोठा तलाव, देवी मंदिराच्या समोर असलेली दाट झाडी व समोर नजरेस नजरेस पडणारे हिरवीगार अशी शेती,शेतमळे व महादेवाचे मंदिर हे नैसर्रागिक सौंदर्सय अतिशय मिळते.
भव्य महाद्वारातून मंदिरात प्रवेश करतो. समोर मोठा चौक, प्रवेशद्वारालगत दोन्ही बाजूस ओवऱ्यां, मध्ये लटकवलेली भव्य घंटा, तसेच चौकातील दोन्ही बाजूस असलेल्या अरुंद ओवऱ्या, समोर असलेला भव्य सभामंडप व महाद्वारातून दिसणारे भव्य शिखर भाविकास भारावून टाकते.चौकात असलेल्या यजकंडातील भस्म राख अंगारा लावून भाविक पायऱ्या चढून दगडी सभामंडपात येतो तेव्हा तेथे वास्तुशास्त्राची एक अजोड कलाकृती त्याच्या नजरेत भरते. सभामंडपाचा आकार ३० फूट लांब व २० फूट रुंद आहे. सभामंडपाचे छत दगडी असून त्यास कोठेही आधार नाही. या सभामंडपात समोर डाव्या बाजूस शंकर तर उजव्या बाजूस गणपती मंदिराचे गाभारे आहेत.
या दोन्ही गाभाऱ्यादरम्यान असलेल्या ५ फूट रुंदीच्या बोळीतून पुढे गेल्यावर श्री मत्स्योदरी देवीच्या गाभाऱ्याचे छोटेसे प्रवेशद्वार आहे. नतमस्तक होऊन आत प्रवेश केल्यावर आपणास जगदंबेचे दर्शन होते. जगदंबेचे गर्भागार ही पर्वतामधील एक छोटीसी ७ फूट रुंदीची व २० फूट लांबीची गुहाच आहे.
मत्स्योदरी देवीचा एक भक्त होता त्याचे नाव होते तानाजी देशमुख नावाचा एक मत्स्योदरी देवीचा भक्त होता नियमाने देवीची पूजा करी, देवीच्या या भक्ताची आख्यायिका देखील खूप प्रसिद्ध आहे असे म्हटले जाते की तानाजी देशमुख यांनी 23 वर मागितला होता तानाजी देशमुख याचे आधी दर्शन घ्यावे नंतर देवीचे दर्शन व्हावे असा. देवीने प्रसन्न होऊन तो वर दिला त्याचप्रमाणे देवीने त्याला वर दिला आणि आजही त्या देवीच्या दर्शना आधी आपण मंदिरात गेले असता तानाजी देशमुख त्यानंतर आपण देवीचे दर्शन घेतो. लोलो लागला अंबेचा या आरतीची निर्मिती देखील झाली.
थोडेसेआग्नेय दिशेकडे तोंड करुन असलेल्या तीन प्रकोष्ठांमध्ये अनुक्रमे महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या त्रय आदिशक्र्तीचे सिंधुरांकित भव्य तांदळे
आपणास दिसतात.एकाच वेळी तीने शक्तींचे सगुण दर्शन झाल्याचा आगळावेगळा आनंद भक्तांच्या मनास होऊन त्याच्या मुखातून सहजपणे जगदंबेचा जयजयकार निघतो.
अनेक वर्षाच्या कालावधीनंतर मूळ मूर्तीपासून सुटून खाली पडतात तेव्हा मूळ मूर्तीचे दर्शन भाविकांना घडते. यापूर्वी एका देवीचा शेंदराचा तांदळा १९७९ साली दसऱ्याच्या महोत्सव नंतर खाली पडला होता. त्यावेळी भाविकांना मूळ रेखीव पाषाण मूर्तीचे सगुण दर्शन झाले होते. या मुळ मूर्ती डोंगरातील प्रस्तरावरच सबकपणे कोरलेल्या आहेत.
Matsyodari Devi Heritage Of Ambad 2024:हे भव्य मंदिर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधल्याचे म्हटले जाते. समर्थ भक्त श्री शंकर श्रीकृष्ण देव यांनी श्रीरामदास संशोधन खंड दुसरा या ग्रंथात या मंदिराच्या भव्य पायऱ्या अहिल्याबाईने बांधल्याचा उल्लेख केलेला आहे. या मंदिराच्या उत्तर बाजूस असलेल्या दरवाज्याने बाहेर पडताच समोरच्या डोंगरात उंचावर एक गुहेसारखी खोली आहे.
मत्स्योदरी मातेच्या सान्निध्यात राहून तपस्या वा अनुष्ठान करणाऱ्या साधकास मठी म्हणून तिचा निश्चितपणे उपयोग होत असावा. कारण या खोलीस असलेल्या दगडी चौकटीच्या दोन्ही आडव्या शिळांवर शिलालेख कोरलेले आहेत. वरच्या शिळेवरील शिलालेख दोन ओळीचा तर खालच्या शिळेवरील खिलालेख तीन ओळीचा आहेत. खाली असलेला शिलालेख स्पष्टपणे वाचता येतो.
आधी ते पुराण करा श्रवण मनन ।
रचलेला वरचा शिलालेख शके १८३९ मध्ये समर्थभक्त शंकरराव देव यांनी वाचण्यांचा प्रयत्न केला व त्यानंतर जी अक्षरे निघाली ती त्यांनी श्रीरामदास संशोधन खंड दोन या ग्रंथात छापलेली आहेत. त्यातील दुसऱ्या ओळीतील शेवटचे शब्द आहेत. मत्स्योदरी देवी नवरात्र उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, तसेच इथे मोठी यात्रा असते.
Matsyodari Devi Heritage Of Ambad 2024:दीपोत्सव
Matsyodari Devi Heritage Of Ambad 2024: मत्स्योदरी देवी मंदिरात मोठ्या उत्साहाने अंबड नगरीकर हे दीपोत्सव साजरा करतात. हा दीप उत्सव कार्तिकी पौर्णिमेला केला जातो.हजारोच्या संख्येत भाविक भक्त येत असून उत्साहात आणि एक रुपयाचा संदेश देतात.
आरती झाल्यानंतरचा विशेष सोहळाhttps://marathionlinetimes.com/devi-farewell-aarti-in-marathi-2024/
रेणुका देवीची परडी श्रद्धेचा अनमोल ठेवा https://marathionlinetimes.com/pardi-goddess-renuka-2024/
करून घेऊया देवीच्या नऊ रंगांची व रूपांची ओळख! https://marathionlinetimes.com/nav-duraga-the-secert-9-goddess-2024/
परशुराम महामंडळाला मिळाली मंजुरी https://marathionlinetimes.com/parshuram-mahamandal-arthik-vikasachi-navi-disha-2024/
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी