Shree Gajanan Leela Gatha 14 Adhyay: श्री गजानन लीला गाथा १४ अध्याय (लहान पोथी)

Shree Gajanan Leela Gatha 14 Adhyay: गुरु गजाननाच्या पोथीचा चौदावा अध्याय!

Shree Gajanan Leela Gatha 14 Adhyay: आज या लेखामध्ये श्री गजानन महाराज यांचा गजानन लीला गाथा म्हणजेच लहान पोथी जी २१ अध्यायाची आहे. या गाथेचा चौदावा अध्यायाय आपल्याला वाचायला मिळणार आहे.

अध्याय चौदावा

श्रीगणेशाय नमः 

।। जय जय श्री समर्थ । गोंदवलेकर रामभक्त ।। तुझ्या पवित्र चरणी नत | मस्तक माझे सदैव ।।१।। रामनामाचा जयजयकार । भूवरी केला खरोखर ।। लोकांनाही पटे अपार । नाम महिमा मनोमनी ।।२।। सीता अशोक वाटिकेत । रामनाम स्मरे अहोरात्र ।। तेणे तेथील आसमेत । रामनामे तल्लीन ।।३।। तैसे तुवा अवघ्यांना । पटविला नाममहिमा ।। करता करता आपुल्या कामा । रामनाम लोक घेती ।।४।। सर्व मंत्रात श्रेष्ठ मंत्र । रामनाम परम पवित्र ।। उच्चारिता अहोरात्र । नुरे पाप वासना ।।५।।

आपण परिस बनोन | उध्दरीले जन पाषाण ।। रामनाम सुवर्ण। त्यांच्या जीवनी प्रकटले ।। ६ ।। रामनामाचा हा मळा । तुम्ही अवधा फुलविला ।। भक्ती परिमल सुटला । रामप्रभू प्रसन्न ।।७।। तेच पवित्र रामनाम । मुखी वसो रात्रंदिन ।। हीच प्रार्थना कर जोडोन । माझी ब्रम्हचैतन्याला ।।८।। आपण साक्षात चैतन्य | खुद्द रामच आपण ।। एखादा तरी स्फुल्लींग । मन अंतरी चेतावा ।।९।। याहुन नसे अन्य आस । रामनामे भरो मानस ।। गजानन चरित्र खास । तव कृपे पूर्ण व्हावे ।। १०।। गजाननाचे शिष्य बहुत । बंकट भास्कर मुख्य त्यात ।। मनी आले नर्मदेप्रत । सोमवतीसी जावे रे ।।११।। गुरुपाशी धाव घेती । चला सांगाते विनविती ।। गुरु नको सांगताती । परी कोणी नायकती ।।१२।।

त्यांच्या सवे ओंकारेश्वरी। गुरु पातले अखेरी ।। दर्शन होता वारकरी । नावेमधुनी चालले ।।१३।। परी पहा ती नौका । खडकावरी आदळे एका ।। तळी बसता जबर धक्का । छिद्र तेथे रे पडले ।।१४।। नावे मध्ये पाणी आले । नावे सह बुडू लागले ।। काळजाचे पाणी पाणी झाले । चाचवा वाचवा विनविती ।।१५।। नर्मदेचे अथांग जले। काठावरती कोलाहल ।। कोण आता वाचवेल । प्राणांतिक विपत्ती ।।१६।। धावा करिती गुरुचा । तोच आधार अखेरीचा ।। नका भिऊ नर्मदेचा । धावा करा म्हणताती ।।१७।।

गजानने नर्मदेला केले असे प्रार्थनेला ।। आई आवरी आपुल्या जला । शेगाव दृष्टी पडू दे ।।१८।। आणि झाला चमत्कार । नाव आली जलावर ।। त्या नावेच्या बरोबर । खुद्द रेवा प्रगटली ।।१९।। नावे तळी हात घाली । काठावर नाव आली ।। आपत्ती ती दूर झाली। गुरु रेवा कृपेने ।। २० ।। नर्मदेचा जयजयकार | भक्त करिती वारंवार ।। गुरुपदी ठेविती शिर | सुखरूप सारे परतले ।।२१।। बंडुतात्या ब्राम्हणाची | गोष्ट आहे मजेची ।। पैसा संपता प्रपंचाची । दैना त्याच्या जाहली ।। २२ ।। जागो जागी क्षणोक्षणी । अपमानाचा तो धनी ।। पुत्र पत्नी कन्या कोणी । त्यास दे ना किंमत ।। २३ ।। देणेकरी दारी येती । पैशांसाठी भंडाविती ।। कुंठित झाली त्याची मती। काय करावे सुचेना ।।२४ ।।

कंटाळला ब्राह्मण । अति झाला हीन दिन ।। हरिद्वारी जाईन। प्राण देईन तो म्हणे ।।२५।। स्टेशनावरी तयाला । कोणी तरी भेटला ।। जा म्हणे शेगावाला । गजानन दर्शना कारणे ।। २६ ।। तात्या येई शेगावाला । गजानन गुरु पाहिला ।। परमभावे पायाला । वंदी द्विज श्रध्देने ।। २७ ।। कशास जासी हिमालया । नको जाऊ जीव द्याया ।। श्रीहरीच्या लाग पाया । दुःख मुक्त होशील ।। २८ ।। तुझ्या मळयात गुप्त धन । बाभुळीखाली असे जाण ।। मध्यरात्र पाहोन । स्वतः खोदूनी काढ ते ।।२९।।

गुरु सांगती तात्याला । तेणे तो आनंदला ।। परतुनी आपुल्या गावाला । करी जैसे सांगितले ।। ३० ।। गुरु वचन सत्य झाले । तात्यास धन मिळाले ।। देणेकऱ्यांचेदेणे दिले। ऋण मुक्त तो झाला ।।३१।। अति आंनदे शेगावाला। बंडु तात्या पातला ।। खर्च त्याने बहु केला। गजाननाकारणे ।।३२।। बंडु तात्या भक्त झाला। वंदी गुरु चरणाला ।। म्हणे मला हात दिला । बुडता बुडता प्रपंची ।।३३।। बंडु तात्याची कथा । वाचिता ऐकता पळे व्यथा ।। मना लाभे शांतता । भाव भक्ती असू द्या. ।।३४।।

इति श्रीगजानन लीला गाथा ग्रंथ चतुर्दशोऽध्यायः समाप्तः ।। शुभं भवतु ।।

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

श्री गजानन लीला गाथा १३ अध्याय (लहान पोथी)

 ‘शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा पाचवा अध्याय !

Shree Gajanan Leela Gatha 14 Adhyay: १८,८८२ पदांसाठी सुवर्णसंधी !

वृंदावन वाले प्रेमानंद जी महाराज..

Shree Gajanan Leela Gatha 14 Adhyay: शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!

“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!

 तुमचं जीवन बदलणारे रहस्य !

 Shree Gajanan Leela Gatha 14 Adhyay: accused-absenteeism-and-the-dispensing-of-313-statements-a-case-study-of-the-bombay-high-courts-approach-in-navneet-singh-gogia-vs-state-of-maharashtra/embed/

 हक्काची पेन्शन! PM श्रमयोगी मानधन योजना तुमच्या कुटुंबासाठी!

Loading