Shree Gajanan Leela Gatha 5 Adhyay: गुरु श्री गजाननाच्या पोथीचा पाचवा अध्याय

Shree Gajanan Leela Gatha 5 Adhyay: गुरु श्री गजाननाच्या पोथीचा पाचवा अध्याय

Shree Gajanan Leela Gatha 5 Adhyay: आज या लेखामध्ये श्री गजानन महाराज शेगाव यांचा श्री गजानन लीला गाथा म्हणजेच लहान पोथी जी २१ अध्यायाची आहे. या गाथेचा पाचवा अध्याय आपल्याला वाचायला मिळणार आहे.

अध्याय पाचवा

श्रीगणेशाय नमः ।।

नमो नमो श्री गुरुदत्ता । नमो नमो अत्रिसुता ।। नमो नमो अनसूया पुता । कृपा करी मजवरी ।।१।। ब्रह्मा विष्णु महेश । तुझीच देवा रूपे खास ।। देऊनिया दर्शनास । मज उध्दरी आज तू ।।२।। अनसूया पतिव्रता । अत्री मुनीची ती कांता ।। तिचे सत्व बघण्याकरिता । त्रैमूर्ती पातले ।।३।। आले बनुनी अतिथी । माथा नमवी अत्रीसती ।। गृही नव्हते तिचे पती । परी उत्तीर्ण परीक्षेत ।।४।। त्रैमूर्तीची कृपा झाली । नांदू लागे दत्तमाउली ।। अनसूया कृतार्थ झाली। पुत्रवती होऊनिया ।।५।।

असो एकदा गजानन । करायासी पर्यटन ।। पिंपळगावालागोन । अकस्मात पातले ।।६।। पिंपळगावी गुरु आले। शिवालयी ध्यान चाले ।। गुराख्यांनी पाहिले। गावी मात सांगती ।। ७ ।। प्रातः काळी गावकरी २। धाव घेती मंदिरी ।। म्हणे साक्षात आले हरी। आम्हा दर्शन द्यावया ।।पालखीमाजी घालोन। गावी नेती गजानन ।। वैसविती आणोन । एका भव्य मंदिरी ।।९ ।।समाधी संपता । कळे सर्व वृत्तांता ।। गावक-यांच्या चित्ता। आनंद तो ठसावला ।।१०।। कोणी आणती भोजना। कोणी देती फळे नाना ।। कोणी दुध -ताक पाना। करवीती गुरुसी ।।११।। जो तो म्हणे भाग्य माझे । दर्शन झाले गुरु रायाचे ।। मनामाजी आनंदाचे । भरते येई भक्तांच्या ।।१२।।

पिंपळगावी गुरु वास । वृत्त कळे बंकटास ।। पत्नीसह नेण्यास । हजर झाला असे तो ।।१३।। म्हणे आता परत चला। न्याया आलो तुम्हाला ।। पिंपळगावच्या जनाला । समजावितो बंकट ।।१४।। ते न काही बोलले। उगाच मौन राहिले ।। गुरु परते निघाले । बंकटाच्या समवेत ।।१५।। जय जय गुरु गजानन । तेथे चाले नामस्मरण ।। गजानन पायी भाव ठेवोन। पिंपळगांव स्तब्ध राहिले ।।१६।।

असो एकदा श्रीगुरुसी । जाणे होते आडगांवासी ।। प्रथम आले अकोलीसी । तहानतयासी लागली ।।१७।। उन्हाळयाचे दिवस होते। नद्या विहिरींना पाणी नव्हते ।। काय करावे गुरुते । प्रश्न मनी पडलेला ।।१८।। तो एक शेतकरी । गुरु देखती शेतांतरी ।। पाण्यासाठी बरोबरी। घागर होती आणली ।।१९।। गुरु मागती पाण्यासी । तहान लागली आम्हासी ।। पुण्य जोडेल अप्रयासी । जरी देशील जलाते ।।२०।।

त्या शेतक-याचे । नाव भास्कर होते साचे ।। पाणी मागता मस्तक त्याचे। फिरुनिया गेले हो ।।२१।। म्हणे पाणी माझ्यासाठी । तुला देऊ कशासाठी ।। निरर्थक उठाउठी। का फिरसी कळेना ।।२२।। जा जा नको विनवणी । भास्कर देई हाकलोनी ।। गुरु सचिंत होऊनी। विहिरी पाशी पातले ।।२३।। तळ दिसे विहिरीचा । थेंब नव्हता पाण्याचा ।। निराशेने गुरुराजा । तरुतळी बैसला ।। २४ ।। त्याने धावा मांडिला। विनविले विठ्ठलाला ।। दे पाणी २४ विहिरीला । तहान मज लागे रे ।। २५ ।। गुरु होते ध्यानस्थ । नामस्मरण करीत ।।विहिरीमाजी खळखळाट । सुरु झाला पाण्याचा ।। २६ ।। पाहता पाहता तुडुब झाली । तहान मग भागली ।। भास्कराने लीला पाहिली । अचंबित झाला तो ।।२७ ।।

कळून आला अधिकार । मस्तक नमवी पायावर ।। तुला बोललो अपार । क्षमाकरी गुरुराया ।।२८ ।। भास्कराने प्रपंच । सोडून दिला अर्धाच ।। म्हणे आता उगाच । कशास त्यात गुंतू मी ? ।।२९ ।। गुरु संगे शेगावाला। भास्करही निघून आला ।। एकनिष्ठ भक्त झाला । सेवा करी गुरुची ।।३० ।। अशी ही गजानन कथा । वर्णन केली इथे आता ।। गजानन लीला चरिता । कल्याण होवो भक्ताचे ।। ३१ ।। अविश्वास धरू नका। नावे कधी ठेवू नका ।। उगाचाच आपुला हेका । व्यर्थ कधी नसावा ।।३२।। जय गजानन श्रीगजानन । भावे करावे गुरुस्मरण ।। मनीचे आर्त पुरोन। मोक्ष जवळी येईल तो ।। ३३ ।। गजानना मजवरी । करी कृपा सत्वरी ।। शेगावाची घडो वारी। हेच आहे मागणे ।। ३४ ।। 

इति श्रीगजानन लीला गाथा ग्रंथ पंचमोऽध्याय समाप्त: ।। शुभं भवतु ।।

Shree Gajanan Leela Gatha 5 Adhyay: आता सोप्या पद्धतीत मिळवा घरबसल्या मतदान कार्ड! 

शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

असं करा इम्प्रेस तुमच्या व्हॅलेंटाईन पार्टनरला!

थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!

“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!

 तुमचं जीवन बदलणारे रहस्य !

accused-absenteeism-and-the-dispensing-of-313-statements-a-case-study-of-the-bombay-high-courts-approach-in-navneet

Loading