Shree Gajanan Leela Gatha 7Adhyay: गुरु गजाननाच्या पोथीचा सातवा अध्याय
Shree Gajanan Leela Gatha 7 Adhyay: आज या लेखामध्ये श्री गजानन महाराज यांचा गजानन लीला गाथा म्हणजेच लहान पोथी जी २१ अध्यायाची आहे. या गाथेचा सातवा अध्यायाय आपल्याला वाचायला मिळणार आहे.
अध्याय सातवा
श्रीगणेशाय नमः
।। जय देवा विठ्ठला। पंढरीशा भक्तपाला ।। आलो आलो दर्शनाला । वारी सवे तुझ्या मी ।।१।। आषाढी कार्तिकीला। नित्य यावे वारीला ।। गाऊनिया तव लीला। जीवन कृतार्थ करावे ।।२।। तू भक्तवत्सल देवाधि देव । संतजनांचा स्वामीराव ।। जन्मोजन्मी त्यांनी ठाव । तुझ्या पायी घेतला ।।३।। पुंडलिक भक्त सखा । त्याच्यासाठी विटे उभा ।। अड्डाविस युगे देखा । तिष्ठलासी मायबापा ।।४।। श्रीज्ञानेश्वर माऊली । मुक्ताबाई सोनुली ।। सारी पदी लीन झाली । अनन्यभावे तुझिया ।।५।। नामदेव भक्त मोठा । भक्तीचाच त्यास ताठा ।। विसोबाकडे गोमटा। गुरु म्हणुनी धाव घेई ।। ६ ।।
नामदेव पायरी। प्रसिध्द आहे पंढरपुरी ।। भक्त श्रेष्ठ खरोखरी। स्वतः स चरणरज मानी तो ।।७।। पांडुरंगा अगाध कीर्ती। किती मी वर्णावी ती ।। तिन्ही लोकी तुझीभक्त वर्णिती आनंदे ।।८ ।। मारुतीच्या मंदिरी। गुरुमूर्ती वास करो ।। भास्कर पाटील बरोबरी । सेवा करी नित्य तो ।।९।। गुरुची तो काळजी घेई। काय हवे नको पाही ।। कंटाळा त्याने कधीही । सेवेचा केला ना ।।१०।। शेगावीची पाटील पोरे । अरेरावी करिती रे ।। मंदिरात सामोरे । गुरुच्याही येती ते ।।११।।
भक्तजन गजानना । गुरु म्हणोनी भजतीना ।। परी हे त्या मुलांना । नाही मुळीच आवडले ।।१२।। कुठला साधू, कुठला संत। निंदा करीती सदोदित ।। गजा गजा पुकारित । धुमाकूळ घालिती ।।१३।। एकदा पाटील हरिने । गुरुसी केले बोलवणे ।। कुस्तीसाठी त्याने। तालमीत नेले की ।।१४।। तेथे गुरुसी उठविणे । अशक्यची होता त्याने ।। लीन होउनी नम्रतेने। पाय धरिले गुरुचे ।।१५।। त्यास कळला अधिकार । परी त्याचे बंधू चार ।। सोडोनिया सार विचार । मंदिरात पोहोचले ।। १६ ।।
सवे आणिले त्यांनी ऊस । गण्या हवे का खाण्यास ।।पुसोनिया ते त्यास । मारावया धावलें ।।१७ ।। प्रहारावरी प्रहार । उसाचा ते देती मार ।। घळ परी ना देहावर । गुरु शांत स्तब्धचि ।।१८।। नसे राग मनी खेद । सम वृत्तीचा तो वेव ।। कसलाही विरोध । त्याने केला नाही की ।।१९।। मार मारुनी पोरे थकली । सामर्थ्याची प्रचिती आली ।। मस्तक गुरुपाऊली । ठेवुनी शरण ते आले ।।२०।। अनंत केले अपराध । घट्ट धरोनी गुरुपाद ।। गुरुकृपेचा अमृत स्वाद । त्यांनी बहुत चाखला ।।२१।।
उर्मटपणा आपुला । विसर्जित त्यांनी केला ।। गुरुरुपी परमेश्वराला । पाहू लागले समवृत्ती ।।२२।। मती त्यांची पालटली । दुर्गुणांची गाठी सुटली ।। सद्गुणांची लाट आली । किल्मिष गेले वाहूनी ।।२३।। मग गुरु ते ऊस । पिळोनिया काढी रस ।। मुलास देती प्यावयास । दर्शन योग शक्तीचे ।।२४ ।। खंडू पाटला वृत्त समजले । भावंडांचे कृत्यही कळले । गजाननाचे त्यास पटले। श्रेष्ठत्व ते लोक हो ।।२५।।
पुढे गजानन कृपेने । पुत्र जाहला त्याकारणे ।। भिवया ऐसे नावे त्याने । गुर्वाशेने ठेविले ।।२५।। आमरस सालीना । खंडू घाली विप्रांना ।। गजाननाची त्याने आज्ञा । तंतोतंत पाळली ।। २७ ।। ऐसी गुरूंची अपार कृपा । पाटील कुळावरी बापा ।। आपणही नाम जपा । करूनी कृपा मिळवू या ।। २८ ।। गजानना तुझ्याविना । अर्थ नसे मम जीवना ।। कोण पुरविल कामना । सांगा आमुची गुरुराया ।।२९ ।। म्हणोनी तुला मनोभावे । हात जोडितो स्वभावे ।। विनवितो उध्दरावे । अन्य आस नसेचि हो।। ३० ।।
इति श्रीगजानन लीला ग्रंथ सप्तमोऽध्याय समाप्तः ।। शुभं भवतु ।।
Shree Gajanan Leela Gatha 7 Adhyay: Premanand Maharaj In Marathi 2025; वृंदावन वाले प्रेमानंद जी महाराज..
Shree Gajanan Leela Gatha 7 Adhyay: शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?
असं करा इम्प्रेस तुमच्या व्हॅलेंटाईन पार्टनरला!
थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!
“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!
Shree Gajanan Leela Gatha 7 Adhyay: accused-absenteeism-and-the-dispensing-of-313-statements-a-case-study-of-the-bombay-high-courts-approach-in-navneet-singh-gogia-vs-state-of-maharashtra/embed/